Ankita Lokhande And Sushant Singh Rajput Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ankita Lokhande: अंकिता- सुशांतची एक अधुरी प्रेमकहाणी...

अंकिता लोखंडे ही नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. सुशांतच्या निधनानंतर अंकिता- सुशांतच्या नात्याची बरीच चर्चा रंगली होती.

Chetan Bodke

Ankita Lokhande: बॉलिवूड अभिनेत्री अंकिता लोखंडे आज ३८ वा वाढदिवस साजरा करत आहे. तिचा जन्म इंदौरमध्ये एका मराठी परिवारात १९ डिसेंबर १९८४ मध्ये जन्म झाला. अंकिता लोखंडे ही नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. सुशांतच्या निधनानंतर अंकिता- सुशांतच्या नात्याची बरीच चर्चा रंगली होती.

सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता लोखंडे यांची पहिली भेट 'पवित्र रिश्ते' या टीव्ही मालिकेच्या सेटवर झाली होती. तेव्हापासून या दोघांच्या मैत्रीला सुरुवात झाली होती, नंतर त्यांच्या या मैत्रीचे रुपांतर प्रेमात ही झाले. बराच काळ ते दोघेही एकत्र रिलेशनशिपमध्ये राहिले सुद्धा. सुशांत सिंग जरी आज आपल्यात नसला तरी, त्याच्या आठवणी आजही चाहत्यांच्या मनात कायम जिवंत आहेत.

सुशांत सिंग तब्बल 6 वर्ष अंकिता लोखंडेसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिला होता. एवढेच नाही तर दोघेही लवकरच लग्नही करणार असल्याची चर्चा सोशल मीडियासह सर्वत्र झाली होती.दोघांनीही त्यांच्यातील नात्याचे स्पष्टीकरण सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना दिले होते. पण नंतर सुशांतने आपल्या अभिनयाच्या जोरावर आणि उत्तम कौशल्यामुळे तो चित्रपटात वळताच एक मोठा स्टार म्हणून ओळख मिळली. तर अंकिता टेलिव्हिजनवरील मालिकेतच राहिली.

यामुळे दोघांच्याही नात्यात कटुता आल्यानंतर दोघांनीही आपले मार्ग वेगळे निवडले. सुशांतच्या 'काय पो चे' या चित्रपटातून त्याला बरीच प्रसिद्धी मिळाली आणि वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये काम मिळू लागले. आपल्या अभिनयाने सुशांत अल्पावधीतच मोठा स्टार बनला. तर अंकिता टीव्ही मालिकांमध्येच काम करत होती.

मिळालेल्या माहितीनुसार, सुशांतच्या फॅन फॉलोइंगवरूनही दोघांमध्ये अनेकदा भांडण झाले होते. सुशांतने दिलेल्या मुलाखतीत हे देखील सांगितले होते की अंकिता खूप सपोर्टिव्ह आहे आणि त्याला अंकिताची ही गोष्ट सर्वात जास्त आवडते. त्याने त्यावेळी त्यावादावर कदाचित पडदा टाकण्याचा प्रयत्न केला असावा.

रिलेशनच्या 6 वर्षांनंतर सुशांत आणि अंकिता यांच्यात असे वादाचे खटके उडाले की त्यांनी विभक्त होण्याचाच निर्णय घेतला. यानंतर दोघांच्या संमतीने ब्रेकअपही झाला . सुशांत चित्रपटसृष्टीत आपले नाव राखण्यासाठी धडपड करत होता तर त्याच वेळी अंकिता लोखंडेही टीव्ही जगतातील एक मोठी स्टार म्हणून उदयास आली. अंकिता अजूनही टेलिव्हिजन दुनियेत कायम सक्रिय असली तरी तिने आपली ओळख आपल्या अभिनयाच्या जोरावर कमावली आहे. अंकिताने गेल्या वर्षी १४ डिसेंबरला बॉयफ्रेंड विकी जैनसोबत लग्न केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT