Rajesh Khanna Instagram @rajesh.khanna_fan_page_
मनोरंजन बातम्या

Rajesh Khanna Birthday: अभिनयापेक्षा राजेश खन्नांना लाईफ स्टाईल होती महत्त्वाची, पहिल्याच चित्रपटाने शिकवली अद्दल

Pooja Dange

Rajesh Khanna Birthday Special: बॉलिवूडचे दिवंगत दिग्गज अभिनेते राजेश खन्ना यांची आज जयंती आहे. २९ डिसेंबर १९४२ साली पंजाबमधील अमृतसर येथे झाला होता. राजेश खन्ना यांना प्रेमाने 'काका' असे म्हणायचे. तर राजेश खन्ना यांचे खरे नाव 'जतिन खन्ना' होते. आज त्यांच्या जन्मदिनी जाणून घेऊया त्यांच्याविषयी काही खास गोष्टी.

राजेश खन्ना यांचे खरे नाव 'जतिन खन्ना' होते. चित्रपटामध्ये काम करण्यास सुरूवात करण्याआधी त्यांनी त्यांचे नाव राजेश खन्ना असे केले. राजेश खन्ना यांच्यासारखे स्टारडम कोणत्याही अभिनेत्याच्या वाटेल आलेले नाही. राजेश खन्ना यांच्या फोटोशी अनेक तरुणींनी लग्न देखील केले होते. राजेश खन्ना याचे चित्रपट पाह्यला जाताना तरुणी डेटवर जाताना जसे नटून जातात तशा जायच्या. राजेश खन्ना यांचा फॅन त्यांच्या सफेद गाडीला किस करून लाल करायच्या तर कधी त्यांना रक्ताने पत्र लिहायच्या.

राजेश खन्ना यांचा चित्रपटातील प्रवास एक टॅलेंट हंट शो जिंकल्यानंतर सुरू झाला होता. राजेश खन्ना यांच्या पहिला चित्रपट 'राज' हा होता. परंतु 'आखिरी खत' हा चित्रपट आधी प्रदर्शित झाला. राजेश खन्नाविषयी असे बोले जाते की, ते अहंकारी होते आणि सेटवर नेहमी उशिरा जायचे. राजेश खन्ना यांच्यावर आधारित 'द उंटोल्ड स्टोरी ऑफ इंडियाज फर्स्ट सुपरस्टार' या पुस्तकाचे लेखक यासिर उस्मान यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, मी लोकांना विचारले की हे 'राज' चित्रपटापासून असे आहे का, तेव्हा समजले की हे आधीपासूनच ते असे होते. (Actor)

पहिल्या चित्रपटाच्या शूटिंगच्या पहिल्या दिवशी सर्वांना ८ वाजता बोलावले होते, परंतु सवयीप्रमाणे राजेश खन्ना ११ वाजता आले. नवीन मुलगा पहिल्या दिवशी असं कसं करू शकतो. राजेश खन्ना यांना वरिष्ठ तंत्रज्ञांनी खडसावले. तेव्हा राजेश खन्ना म्हणाले, 'अभिनय आणि करियरच्या ऐशी की तैशी... मी कोणत्याच कारणांनी माझी लाईफ स्टाईल नाही बदलणार.'

'आराधना' चित्रपटानंतर राजेश खन्ना यांना खूप यश मिळाले. सगळीकडे त्यांचीच चर्चा होती. राजेश खन्ना त्याचे एकेवेळी दोन चित्रपट जरी प्रदर्शित झाले तरी प्रेक्षक दोन्ही चित्रपट बघायचे. राजेश खन्ना याचे बॅक टू बॅक १३-१४ चित्रपट हिट झाले होते. यात काही 'जुबली हिट' होते तर काही ब्लॉकबस्टर ठरले. असे म्हटले जाते की, सर्व मोठ्या थिएटरमध्ये राजेश खन्ना यांचे चित्रपट सहा ते सात महिने चालायचे. (Movie)

३२ वर्षीय राजेश खन्ना यांचे लग्न १७ वर्षीय डिंपल कपाडियाशी झाले. त्याआधी राजेश खन्ना ७ वर्ष अंजु महेंद्र हिला डेट करत होते. राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांना ट्विंकल आणि रिंकू अशा दोन मुली आहेत. बॉबी चित्रपटानंतर डिंपल यांनी चित्रपटातून ब्रेक घेतला होता. टीना मुनीम यांच्यासह राजेश खन्ना यांची वाढती जवळीक यामुळे त्यांच्या आणि डिंपलच्या नात्यात दुरावा आला आणि १९८२साली ते वेगळे झाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dombivli Politics : मंत्र्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच विरोधात बॅनरबाजी, प्रकरण थेट पोलिसांत पोहोचलं

Mumbai Crime : पार्किंगवरून भांडण, महिलेकडून विनयभंगाच्या गुन्ह्याची धमकी; भीतीपोटी वृद्धाने संपवले आयुष्य

Special Story: हमास, हिजबोल्ला एकवटले, इस्त्राईलला घेरले; मोसाद विरूद्ध मुस्लिम संघर्षाची इनसाईड स्टोरी

Jitada Fish : चविष्ट 'जिताडा' समुद्रातून होतोय गायब, मच्छिमारांच्या हातीही लागेना; काय आहे कारण? पाहा व्हिडिओ

Maharashtra News Live Updates : वडीगोद्रीत मराठा आणि ओबीसी आंदोलक आमनेसामने, घटनास्थळी पोलीस तैनात

SCROLL FOR NEXT