Shah Rukh Khan's statement on the Pathaan controversy Instagram @iamsrk
मनोरंजन बातम्या

Pathaan Controversy: आम्ही कोणत्याही परिस्थितीत पॉझिटीव्ह राहणार, पठानच्या वादावर शाहरुखनं दिली पहिली प्रतिक्रिया

शाहरुखने ट्रोलिंग करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.

Pooja Dange

Shah Rukh Khan On Pathaan: बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. सोशल मीडियावर या चित्रपटावर प्रचंड विरोध होत आहे. शाहरुखने आता या ट्रोलिंगवर नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. शाहरुखचे हे वक्तव्य व्हायरल होत आहे. या चित्रपटातील 'बेशरम रंग' हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. हे गाणे प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाला सर्व स्तरातून विरोध होत आहे.

चित्रपटाला होत असलेल्या विरोधावर शाहरुख खानने म्हटले की, काहीही झाले तरी आमच्यासारखे लोक कोणत्याही परिस्थितीत सकारात्मक राहतील. शाहरुख खानच्या या वक्तव्यावरून स्पष्ट होते की, ट्रोलिंगने त्याला काही फरक पडत नाही. या चित्रपटाबाबत एकापाठोपाठ एक नवे वाद निर्माण होत आहेत. मध्य प्रदेशचे मंत्री नरोत्तम मिश्रा यांनी चित्रपटातील दीपिकाच्या भगव्या कपड्यांवर आक्षेप घेतला आहे. आता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते चिगुरुपती बाबू राव यांनीही या गाण्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. (Shah Rukh Khan)

'पठान' चित्रपटातील 'बेशरम रंग' या गाण्यावरून वाद वाढत चालले आहेत. यावर शाहरुख खानच्या बाजूने आलेली ही प्रतिक्रिया बरंच काही सांगून जाते. 28व्या कोलकाता फिल्म फेस्टिव्हलच्या मंचावर भाषण देताना शाहरुखने त्याच्या आगामी 'पठान' चित्रपटाबाबत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 'जग काय करते याने फरक नाही पडत, आमच्यासारखे लोक नेहमीच सकारात्मक राहतील, 'आम्ही जिवंत आहोत याचा मला आनंद आहे.' या विधानातून शाहरुखचा आत्मविश्वास तर दिसून येत आहे. पण तो आज या टप्प्यावर का आहे हेही कळून येत आहे. (Bollywood)

या गाण्यातील दीपिकाच्या बोल्ड अवतारावर काही लोक नाराजी व्यक्त करत आहेत. त्याचबरोबर काही लोक त्याचे समर्थन देखील करत आहेत. अलीकडेच शाहरुख खानने वैष्णोदेवी मंदिरात जाऊन दर्शन घेतले होते, त्यावरही लोकांनी टीका केली होती. शाहरुख खान वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी गेला होता. त्यानंतर त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनलेला 'पठाण' 25 जानेवारी 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदीसह तेलुगू आणि तामिळ भाषेतही प्रदर्शित होणार आहे. (Movie)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story : जव्हारमधील शेतकऱ्याची गगन भरारी! दोन एकर शेतीतून तरुण बनला लखपती

Jalebi Recipe: घरी आलेल्या पाहुण्यासाठी हॉटेलस्टाईल कुरकुरीत जलेबी बनवा घरच्या घरी, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: नंदुरबारमध्ये निकालाचा एक दिवस अगोदर तळोदा शहरात जादूटोणा

महिलेला बोगस मतदान करताना पकडलं अन्...; नांदेडमध्ये नेमकं काय घडलं? VIDEO

BMC Election : महाविकास आघाडी फुटली; मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार

SCROLL FOR NEXT