Bigg Boss Marathi 4: चुलीत घाल तुझी स्ट्रॅटजी; अमृता धोंगडेने केला विकासच्या खेळाचा खेळखंडोबा

अमृता धोंगडे आणि विकास सावंतमध्ये जुंपली.
Bigg Boss 4
Bigg Boss 4 Saam Tv

Bigg Boss 4 Latest Episdoe: बिग बॉस मराठीचे हे चौथे पर्व सुरू आहे. या पर्वतामध्ये अनेक पाहायला मिळत आहे, ज्या यापूर्वी बिग बॉस मराठीमध्ये घडल्या नव्हत्या. बिग घरामध्ये कधी काय होईल याचा नेम नाही. बिग बॉस नेहमीच स्पर्धकांना धक्के देत असतात. या धक्क्यांनी स्पर्धकांची तारांबळ उडते. कधी मित्र शत्रू होतात तर कधी शत्रू मित्र.

बिग बॉस मराठीमध्ये सध्या भूतमय वातावरण आहे. भूत या थीमवर आधारित टास्क या आठवड्यात खेळले जात आहेत. या आठवड्यात अमृता देशमुख, अमृता धोंगडे, अपूर्वा नेमळेकर, विकास सावंत, प्रसाद जवादे, किरण माने हे घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झाले आहेत. सध्या घरामध्ये कॅप्टन्सी कार्य सुरु आहे.

बिग बॉसने कॅप्टन्सी कार्यात स्पर्धकांनी स्पर्धकांचा खून करून एकेमकांना एलिमिनेट करायचे होते. किरण माने आणि राखी सावंत खुनी होते तर बाकीच्या स्पर्धकांचे खून होणार होते. या टास्कमध्ये कोण कुणी आहे आणि कोण कोणाचा खून कारण हे माहित नव्हते. त्यामुळे सगळे एकमेकांवर आरोप करत होते. तर राखी आणि किरण आपले काम करत होते.

Bigg Boss 4
Vivek Oberoi: बॉलिवूडमुळे माझं करिअर उद्ध्वस्त; हिट चित्रपटानंतरही विवेकवर आली होती घरी बसण्याची वेळ

किरणने या कार्यात अमृता देखमुख, प्रसाद जवादे आणि विकास सावंत यांचा खून केला. तर राखीने अपूर्वाचा खून केला. आरोह वेलणकर, अक्षय केळकर आणि अमृता धोंगडे यांचा खूप करण्यात दोघेही अयशस्वी ठरले. तीन खून करून किरण माने या कार्यात विजयी ठरले. त्यामुळे किरण, आरोह, अक्षय, अमृता धोंगडे हे कॅप्टन्सीसाठी लढणार आहेत. परंतु बिग बॉसने यामध्ये सुद्धा ट्विस्ट आणला आहे. (Celebrity)

बिग बॉसने कॅप्टन्सीच्या उमेदवारांना समर्थक निवडायला सांगितले. आरोहने-अमृता देखमुख, अक्षय-अपूर्वा, किरण माने-प्रसादे जवादे, अमृता धोंगडे-विकास सावंत अशा जोड्या या कार्यासाठी बनल्या. जोड्या झाल्यावर बिग बॉसने सांगितले की ज्या स्पर्धकांना तुम्ही समर्थक म्हणून निवडले आहे ते तुमचे विरोधक आहेत आणि तुम्हाला एकमेकांविरुद्ध लढायचे आहे.

आजच्या भागात घरामध्ये अमृता धोंगडे आणि विकास हे टास्कविषयी चर्चा करताना दिसणार आहेत. अमृता विकासला म्हणते, तू उभं राहून गोळा करत होतास. यावर विकास म्हणाला, नीट बघ कॅमेरामध्ये कळेल तुला. तर किरण माने म्हणाले, आम्हाला वाटलं तुला गुडघ्यावर बसता येत नाही. विकास म्हणतो, कसं बसता येईल? जाळी डोक्यावर लागते. कसं बसणार मी? किरण माने विकासाला म्हणतात, तुला गुडघ्यावर बसता नाही येत का? नसेल येत तर ठीक आहे. त्यांना उत्तर देत विकास म्हणतो, माझी स्ट्रॅटजी आहे ती, मी काय करु, माझी स्ट्रॅटजी तीच होती तिथे. यावर अमृता त्याला म्हणते, अरे बापरे स्ट्रॅटजी... चुलीत घाल तुझी स्ट्रॅटजी... (Bigg Boss Marathi)

विकासाच्या स्ट्रॅटजीमुळे अमृता धोंगडे दिलेले हे उत्तर खूप काही सांगून जाते. टास्कमध्ये विकासने काहीतरी नक्कीच केले असणार ज्यामुळे अमृता धोंगडे आणि किरण त्याला इतके प्रश्न विचारत आहेत. आता टास्कमध्ये नेमके काय झाले आणि कोण ठरला बिग बॉस मराठी ४च्या ११ व्या आठवड्याचा कॅप्टन हे आपल्याला आजच्या भागात पाहायला मिळणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com