जगाला आपल्या आवाजाने भुरळ पाडणाऱ्या यो यो हनी सिंगचा (Yo Yo Honey Singh ) मोठा चाहता वर्ग आहे. हनी सिंग नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतो. सध्या तो त्याच्या आगामी प्रोजेक्टमुळे पुन्हा चर्चेत आला आहे. यो यो हनी सिंग हा मोठा रॅपर आहे. आता त्याच्या आयुष्यावर एक डॉक्युमेंटरी फिल्म प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
हनी सिंगच्या डॉक्युमेंटरीचे नाव 'यो यो हनी सिंग फेमस' (Yo Yo Honey Singh Famous) असे आहे. ही डॉक्युमेंटरी ओटीटीवर पाहाता येणार आहे. या डॉक्युमेंटरीचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलर पाहून चाहते डॉक्युमेंटरी पाहण्यासाठी खूप उत्सुक दिसत आहेत. या डॉक्युमेंटरीतून हनी सिंगच्या संघर्षाची कहाणी पाहायला मिळणार आहे.
'यो यो हनी सिंग फेमस' च्या ट्रेलरमध्ये बॉलिवूडचा भाईजान म्हणजे सलमान खान हनी सिंगचे कौतुक करताना पाहायला मिळत आहे. या डॉक्युमेंटरीतून हनी सिंग आपल्या यशाचे सिक्रेट उलगडणार आहे. हे सिक्रेट डॉक्युमेंटरीच्या रुपात 20 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हनी सिंगची ही डॉक्युमेंटरी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. 'यो यो हनी सिंग फेमस' या डॉक्युमेंटरीचे दिग्दर्शन मोझेस सिंग यांनी केले आहे.
हनी सिंगचे खरे नाव हिरदेश सिंग आहे. हनी सिंग दिल्लीत राहणारा सामान्य मुलगा होता. त्याने २४ वर्षे खिडकी नसलेल्या घरात काढली. छोट घर ते लोकप्रिय रॅपरपर्यंतचा प्रवास तुम्हाला डॉक्युमेंटरीतून पाहता येणार आहे. तसेच आजारपणातून त्याचा दमदार कमबॅक पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत.
आजही हनी सिंगच्या गाण्यावर तरुणाई थिरकताना दिसते. आपल्या हटके स्टाइल आणि स्वॅगने त्याने चाहत्यांना भुरळ घातली आहे. आजवर हनी सिंगने अनेक हिट गाणी दिली आहेत. त्याची लुंगी डान्स, आता माझी सटकली ही गाणी खूप लोकप्रिय झाली. त्याला बॉलिवूडमध्ये देसी कलाकार अशी ओळख मिळाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.