KK Last Marathi Song Released
KK Last Marathi Song Released Saam Tv
मनोरंजन बातम्या

KK Marathi Song Released: केकेचं शेवटचं गाणं ऐकून चाहत्यांना आली आठवण, म्हणाले ‘एकांत हवा...’

Chetan Bodke

Ekant Hawa Marathi Song Released: बॉलिवूडचे सुप्रसिद्ध गायक केके अर्थात कृष्णकुमार कुन्नथ यांनी आपल्या आवाजातून सर्वांनाच मंत्रमुग्ध केलंय. केके यांच्या आवाजाची जादू आजच्या तरूण पिढीला ठावूक आहे. आजची पिढी केकेच्या गाण्यांची प्रचंड मोठी फॅन आहे. केके यांच्या सिनेकारकिर्दित आतापर्यंत अनेक बॉलिवूड, तमिळ,तेलुगू आणि मल्याळम भाषेसह इतर भाषेत आपल्या आवाजाची जादू प्रेक्षकांना दाखवली. गायक कृष्णकुमार कुन्नथ यांचं गेल्या वर्षी ३१ मे २०२२ रोजी हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने निधन झालं.

‘तडप तडप’, ‘याद आऐंगे वो पल’, ‘आँखो मे तेरी’ यासह अनेक गाण्यांच्या माध्यमातून केके आजही प्रेक्षकांमध्ये प्रसिद्ध आहेत. नुकतंच केके यांचं मराठीतील नवं गाणं प्रदर्शित झाले आहे. त्यांचे मराठी गाणे देखील आहे, ही गोष्ट फार अनेकांना माहित आहेत. मराठी चाहत्यांसाठी ही फार मोठी पर्वणी असून ‘अंब्रेला’ चित्रपटाच्या माध्यमातून केके यांचं शेवटचं मराठी गाणं आपल्या भेटीला आलं आहे.

मनोज विशे दिग्दर्शित ‘अंब्रेला’ चित्रपट येत्या ९ जूनला प्रदर्शित होणार आहे. केके यांनी २०१४ मध्ये चित्रपटातील पहिलं गाणं गायलं होतं. त्यांनंतर त्यांच्याच आवाजातील दुसरं गाणं रेकॉर्ड करण्यात आलं. आता हे दुसरं गाणं केके यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रदर्शित करण्यात आलं आहे. ‘एकांत हवा’ या गाण्याचे बोल असून प्रेक्षकांकडून या गाण्याला तुफान प्रतिसाद मिळत आहे. केके यांनी गायलेलं हे शेवटचं मराठी गाणं ठरलंय. (Entertainment News)

त्यांच्या आवाजातल्या ‘एकांत हवा’ या गाण्यातून तरुणाईच्या मनातला उद्वेग अगदी थेट काळजापर्यंत जाऊन भिडतो. चित्रपटाच्या कथानकाला केके (singer KK) यांच्या आवाजाने एक वेगळीच ताकद मिळाली आहे. मराठी भाषेतील केके यांनी गायलेलं हे गाणं चित्रपटाचा पहिल्यांदाच भाग ठरल्याने ते गाणे कमालीचे चर्चेत आले आहे.

अभिनेता अभिषेक सेठीया आणि अभिनेत्री हेमल इंगळे यांच्यातल्या प्रेमाची केमिस्ट्री प्रेक्षकांना चित्रपटात पाहायला मिळणार आहे. पण अरुण नलावडे आणि सुहिता थत्ते यांच्या कसदार अभिनयाची मेजवानीही प्रेक्षकांना चित्रपटाचा पुरेपूर आनंद देणारी ठरेल.

चित्रपटाची निर्मिती, दिग्दर्शन, संवाद आणि पटकथा लेखन मनोज विशेंनी केलं आहे. स्वरनादची प्रस्तुत या चित्रपटाची गाणी मंगेश कंगणे यांनी लिहिली असून ती संतोष मुळेकर यांनी संगीतबद्ध केली आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Benifits of Cereals: डाळ खाल्यामुळे आरोग्याला होणारे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

Tanvi Mundle : मराठी अभिनेत्रीचा बीचवर बिंधास्त फोटोशूट

Nana Patole On Opposition | एकेएक सगळेच विषय, नाना पटोलेंचा घणाघात!

Foods for Skin and Weightloss: रात्री 'या' फळांचे सेवन केल्यास त्वचेसोबत वजन राहिल नियंत्रणात

Pune Hit and Run Case | अल्पवयीने मुलाने दोघांना चिरडले! वडिलांवर होणार गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT