Jubin Nautiyal Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jubin Nautiyal: जुबिनने चाहत्यांना दिली हेल्थ अपडेट, सोशल मीडियावर फॅन्ससह सेलिब्रिटी म्हणतात…

जुबिनला दुखापत झाल्या झाल्या काही वेळातच त्याला मुंबईतील रूग्णालयात हलवण्यात आले. नुकतीच जुबिनची हेल्थ अपडेट समोर आली आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याची हेल्थ अपडेट दिली आहे.

Chetan Bodke

Jubin Nautiyal: बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक जुबिन नौटीयाल गुरुवारी त्याच्या घरातील पायऱ्यांवरून पडला. या अपघातामध्ये त्याच्या हातचे कोपर तुटले असून त्याच्या बरगड्यांनाही दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे. सोबतच जुबिनच्या डोक्याला आणि कपाळाला जखमा झालेल्या आहेत. जुबिनला दुखापत झाल्या झाल्या काही वेळातच त्याला मुंबईतील रूग्णालयात हलवण्यात आले. नुकतीच जुबिनची हेल्थ अपडेट समोर आली आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याची हेल्थ अपडेट दिली आहे.

त्याच्या आपघाताची बातमी कळताच चाहत्यांना फार मोठा धक्का बसला होता. सध्या त्याच्या आरोग्यासाठी सर्वच त्याचे चाहते प्रार्थना करत आहेत. नुकतीच जुबिनने इन्स्टाग्रामवर एक हॉस्पिटलमधील फोटो शेअर केला आहे. त्याच्या पोस्टच्या खाली त्याने लिहिले की, 'तुमच्या सर्व आशिर्वादांसाठी धन्यवाद. देव माझ्यावर लक्ष ठेवून होता आणि त्या भीषण अपघातातून मला वाचवले. मला डिस्चार्ज मिळाला आहे आणि मी बरा होत आहे. तुमचे प्रेम आणि प्रार्थना बद्दल धन्यवाद.'

त्याच्या या हेल्थ संबंधित पोस्टवर बऱ्याच चाहत्यांच्या कमेंट येत आहेत. सोबतच काही सेलिब्रिटींच्या ही कमेंट येत आहेत. निती मोहनने लिहिले आहे की, 'लवकर बरा हो, तुला खूप प्रेम आहे.' रॅपर बादशाहने लिहिले, 'भाऊ लवकर बरा व्हा.' अशा अनेक प्रतिक्रिया जुबिनच्या पोस्टवर येत आहेत. त्याचा हा हॉस्पिटलमधील जेवतानाचा फोटो सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे.

नुकतेच जुबिन नौटियालचे 'तू सामना आये' हे गाणे चाहत्यांच्या भेटीला आले असून जुबिन आणि योहानीने हे गाणे एकत्र गायले आहे. गुरुवारी जुबिन आणि योहानी गाण्याच्या लाँचच्या वेळी एकत्र दिसले होते. यानंतरच त्याला दुखापत झाल्याचे वृत्त आहे.

२०१४ मध्ये 'सोनाली केबल' हे पहिले गाणे गायले असून त्याने कबीर सिंग मधील 'तुझे कितना चाहें और हम'या गाण्याने बरीच लोकप्रियता मिळवली. यानंतर जुबिनने हिंदीसह तमिळ, तेलगू, कन्नड आणि बंगाली चित्रपटांचे गाणे आपल्या दमदार आवाजाने गायले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Divya Deshmukh: 64 घरांची राणी वर्ल्डकप विजेत्या दिव्या देशमुखबद्दलच्या 'या' 10 गोष्टी जाणून घ्या

Raigad : डिश रिपेअरिंगसाठी घरात घुसले, सोन्याचे दागिन्यांकडे मन वळलं, नंतर अल्पवयीन तरुणांचं वृद्ध महिलेसोबत धक्कादायक कृत्य

Pune News: पुण्यात दिवसभरात दुसरी आत्महत्या; तृतीयपंथीनं खडकवासला धरणात उडी मारून मृत्यूला कवटाळलं

Tuesday Horoscope : या राशींच्या व्यक्तींना नागदेवता पावणार, वाचा उद्याचे राशीभविष्य

Maharashtra Live News Update: नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT