Armaan Malik And Aashna Shroff Engagement Photos Twitter
मनोरंजन बातम्या

Armaan Malik Engagement: प्रसिद्ध गायक अरमान मलिकने गुपचूप उरकला साखरपुडा, फोटो सोशल मीडियावर व्हायरल; पाहा PHOTO

Armaan Malik And Aashna Shroff Engagement: सुप्रसिद्ध गायक अरमान मलिकने गर्लफ्रेंड आशना श्रॉफसोबत साखरपुडा उरकला आहे.

Chetan Bodke

Armaan Malik And Aashna Shroff Engaged

गायक अरमान मलिक याने गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर आपल्या प्रेमाची कबुली देत फोटो शेअर केले होते. नुकतंच सुप्रसिद्ध गायकाने गर्लफ्रेंड आशना श्रॉफसोबत साखरपुडा उरकला आहे. सध्या त्यांचे सोशल मीडियावर साखरपुड्याचे अनेक फोटो प्रचंड व्हायरल होत आहे.

अरमान मलिक लवकरच नवीन आयुष्याची सुरुवात करत असल्यामुळे त्याच्यावर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अरमान मलिकने आणि गर्लफ्रेंड आशना हिने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत प्रेमाची कबुली दिली होती.

आता नुकताच आशना आणि अरमानने मित्रपरिवार आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत साखरपुडा उरकला आहे. अरमानने साखरपुड्यातले अनेक फोटो इन्स्टाग्रामवरुन स्टोरीवरुन चाहत्यांसोबत शेअर केले.

अरमान मलिकच्या ‘कसम से’ या गाण्यामध्ये आशना श्रॉफने प्रमुख भूमिका साकारली. तेव्हापासून त्यांच्या रिलेशनची चर्चा सुरु होती. साखरपुड्याला अरमानने खास सफारी सूट परिधान केला होता तर, आशनाने साडी परिधान केली आहे.

Armaan Malik And Aashna Shroff Engagement Photos

२८ वर्षीय अरमान मलिकने इंस्टाग्रामवर एंगेजमेंटचे फोटो पोस्ट करत कॅप्शन दिले की, “आणि आता आम्ही कायमचे एकत्र राहणार...” शेअर केलेल्या या फोटोमध्ये, अरमान त्याची गर्लफ्रेंड आशना श्रॉफला एंगेजमेंट रिंग घालताना दिसत आहे.

त्याचवेळी तो आशनाला गुडघ्यावर बसून प्रपोज करताना दिसत आहे. अरमान मलिकने 'जेहर', 'बोल दो ना जरा', 'पहेला प्यार', 'मुझको बरसात बना लो' ते 'मैं राहून या ना राहून' अशा अनेक सुपरहिट गाण्यांमुळे त्याला प्रसिद्धी मिळाली.

आशना श्रॉफ एक प्रसिद्ध युट्युबर, ब्लॉगर, सोशल मीडिया सेलिब्रिटी म्हणून तिची सर्वत्र ओळख आहे. ती फॅशन आणि ब्यूटी प्रॉडक्ट संबंधित ब्लॉग बनवते. आशनाने लंडनमधून फॅशन आणि मॉडेलिंगचे शिक्षण घेतले आहे. अभिनेत्रीचा जन्म ४ ऑगस्ट १९९३ रोजी झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT