Aastad Kale: ...हीच वाघनखं वापरल्याचा काही ठोस पुरावा आहे का?, आस्ताद काळेची ती पोस्ट चर्चेत

Aastad Kale On Wagh Nakh: अभिनेता आस्ताद काळे (Actor Aastad Kale) याने वाघनखांसंदर्भात केलेली पोस्ट सध्या चर्चेत आली आहे.
Aastad Kale On Wagh Nakh
Aastad Kale On Wagh NakhSaam Tv
Published On

Aastad Kale FB Post:

छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) वाघनखं लवकरच महाराष्ट्रात आणण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी यासंदर्भात काही दिवसांपूर्वी मोठी घोषणा केली होती. वाघनखं महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असून मुख्यमंत्री आणि ब्रिटिश प्रशासनाशी सामंजस्य करार करून त्यामधील अटींची पूर्तता करून ही वाघनखं नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्रात आणण्यात येतील, असं मुनगंटीवार यांनी सांगितले होते.

त्यांच्या या घोषणेनंतर वाघनखं हा चर्चेचा विषय ठरत आहे. अशामध्ये मराठमोळा अभिनेता आस्ताद काळे (Actor Aastad Kale) याने वाघनखांसंदर्भात केलेली पोस्ट सध्या चर्चेत आली आहे.

आस्ताद काळेने नुकताच आपल्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरून वाघनखांसंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. त्याची ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्याने काही प्रश्न उपस्थित केले आहेत. आस्ताद काळेने आपल्या पोस्टमध्ये असे लिहिले की, '"वाघनखं" आपल्याकडे आली आहेत हे चांगलंच आहे. त्यासाठी प्रयत्न केलेल्या सर्वांचं मानापासून अभिनंदन आणि आभार. पण ती आपल्याला "देऊन टाकली" नाही आहेत याची कृपया नोंद घ्यावी या ठिकाणी.'  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'जगातील सर्व संग्रहालयं एकमेकांना स्वतःकडच्या वस्तू अशाप्रकारे काही काळापुरती देतच असतात. प्रचंड मोठी रक्कम डिपॉझिट म्हणून यासाठी घेतली जाते. कागदोपत्री खूप काटेकोर आणि कायदेशीर व्यवहार त्यासाठी केला जातो. आणि एक प्रामाणिक शंका आहे. जाणकारांनी कृपया निरसन करावं. नतद्रष्ट अफझुल्याचं पोट फाडायला हीच वापरली होती, याचा ठोस काही पुरावा सादर झाला आहे का? हे मी जेन्युअनली विचारतोय. पुन्हा सांगतो, हा ऐतिहासिक ठेवा आत्ता स्वगृही असल्याचा आनंद निश्चितच आहे.'

Aastad Kale On Wagh Nakh
Ranveer Reveal Deepika's Secrete: काय सांगता! रणवीर - दीपिकाने २०१५ मध्ये गुपचूप केला होता साखरपुडा; 'कॉफी विथ करण'मध्ये स्टार कपलचा खुलासा

दरम्यान, वाघनखे भारतात आणण्यासाठी यशस्वी सामंजस्य करार केल्याबद्दल काही दिवसांपूर्वी मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतील कलकारांनी सुधीर मनुगंटीवार यांचे कौतुक करत त्यांचा सत्कार केला होता. सुभाष घई, जॅकी श्रॉफ, महेश कोठारे, शरद केळकर, संदीप कुलकर्णी, विजय पाटकर, भारत गणेशपुरे, समीर दीक्षित, सौरभ गोखले, शिव ठाकरे, संदीप घुगे आणि मेघा धाडे यांनी सुधीर मनुगंटीवार यांचा सत्कार केला.

Aastad Kale On Wagh Nakh
Rajinikanth Viral Video: सेम टू सेम रजनीकांत! पायात स्लिपर आणि हाफ पँट घातलेल्या 'थलाइवर'ला पाहून चाहते चकीत, VIDEO व्हायरल

सेलिब्रिटींनी केलेल्या सत्कारानंतर सुधीर मनुगंटीवार यांनी ट्वीट करत सर्वांचे आभार मानले होते. त्यांनी या कलाकारांसोबतचे फोटो शेअर केले होते. या ट्वीटला कॅप्शन देत त्यांनी असं लिहिलं होतं की, 'छत्रपती शिवरायांची वाघनखे भारतात आणण्यासाठी यशस्वी सामंजस्य करार केल्याबद्दल भारतीय सिनेसृष्टीतील नामवंत निर्माते, प्रतिभासंपन्न दिग्दर्शक, अभिनेते यांनी आज मुंबईत घरी येऊन माझा सत्कार आणि अभिनंदन केले हा माझ्या जीवनातील आणखी एक अनमोल क्षण ठरला.'

Aastad Kale On Wagh Nakh
Sumona Chakravarti Dance: दुर्गा पूजेत धुनुची घेऊन सुमोना चक्रवर्तीने धरला ठेका; VIDEO व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com