Arjit Singh Net Worth: अरिजित सिंग हा असा बॉलिवूड स्टार आहे, ज्याने आपल्या आवाजाने सर्वांना वेड लावले आहे.चाहते त्यांची गाणी फक्त ऐकत नाहीत तर मनापासून अनुभवतात. आज अरिजीत त्याचा ३६ वा वाढदिवस साजरा करत आहे. सुरेल आवाज आणि सुरांचा बादशाह, अरिजित सिंग हा इंडस्ट्रीतील टॉप गायकांपैकी एक आहे.बॉलिवूडचा सुप्रसिद्ध गायक अशी अरिजित सिंगची ओळख आहे.
अरिजितने त्याच्या सुमधूर आवाजाने साऱ्यांनाच मंत्रमुग्ध केले आहे. अरिजित सिंगची गाणी कोणाला माहित नाही असं कोणी शोधून सापडणार नाही. सोशल मीडियावर अरिजितच्या गाण्यांना सर्च देखील करायला लागत नाही. केवळ देशातच नाही तर परदेशातही अरिजितचा चाहतावर्ग आहे. चाहते त्याची गाणी केवळ ऐकत नाही तर अनुभवतात. आज वाढदिवसानिमित्त सुप्रसिध्द गायक अरिजितच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेऊया...
अरिजीत सिंग बॉलिवूडचा सुपरस्टार गायक म्हणून ओळखला जातो , मात्र अरिजितचा प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे. लहानपणापासूनच गायनाची आवड असलेल्या अरिजितने वयाच्या १८ व्या वर्षी रिअॅलिटी शोमधून केली आहे. २००५ मध्ये अरिजितने रिअॅलिटी शो फेम गुरुकुलमध्ये भाग घेतला होता. यामध्ये त्याच्या गाण्याला प्रेक्षकांकडून नापसंती मिळाली होती. कमी मते मिळाल्यामुळे तो एलिमिनेट झाला होता.
मात्र यानंतर अरिजितने '10 के 10 ले गए दिल' या शोमध्ये भाग घेतला आणि शो जिंकून अरिजितने त्याचा प्रवास सुरू केला. आज बॉलीवूड आणि इंडस्ट्रीमधील टॉप गायक म्हणून अरिजित ओळखला जातो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे एवढं यश मिळवूनही अरिजित सिंग अतिशय साधं आयुष्य जगतो.
अरिजित सिंग इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या गायकांपैकी एक आहे. अरिजितच्या एकूण संपत्तीबद्दल ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. अतिशय साधेपणाने जगणारा अरिजित सिंग एका तासाच्या लाइव्ह कॉन्सर्टसाठी १.५ कोटी रुपये घेतो. तर एका चित्रपटातील गाण्यासाठी ते ८-१० लाख रुपये मानधन घेतो. अरिजितकडे ७ मिलियन डॉलर्सपेक्षा जास्त संपत्ती आहे. म्हणजेच अरिजित ५५ कोटी रुपयांच्या मालक आहे.
अरिजित सिंग एका महिन्याला ५० लाखांपेक्षा जास्त मानधन घेतो आहे. अरिजित इंडस्ट्रीतला सर्वाधिक कर भरणारा अभिनेता आहे. याशिवाय तो एका एनजीओचाही भाग आहे. सुपरस्टार असूनही तो अत्यंत साधे आयुष्य जगतो. अरिजित नवी मुंबईतील प्राइम भागात राहतो. त्यांच्या घराची किंमत सुमारे ८ कोटी रुपये आहे. अरिजितला गाड्यांची आवड आहे. त्याच्याकडे लक्झरी गाड्याचं कलेक्शन आहे. ज्यामध्ये हमर, रेंज रोव्हर, मर्सिडीज-बेंझ या गाड्यांचा समावेश आहे.