A. R. Rehman Name In Canada Street  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Happy Birthday A. R. Rahman: ए. आर. रहमानच्या शिरपेचात मानाचा तुरा, परदेशात मिळाला 'हा' सन्मान...

बॉलिवूडचा सुप्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमानने अनेक वर्ष भारतीय संगीतात मोलाचं योगदान दिले आहे. त्याच्या गाण्यांचे भारतासह परदेशात बरेच चाहते आहेत.

Chetan Bodke

Happy Birthday A. R. Rahman: बॉलिवूडचा सुप्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमानने अनेक वर्ष भारतीय संगीतात मोलाचं योगदान दिले आहे. त्याच्या गाण्यांचे भारतासह परदेशात बरेच चाहते आहेत. सुरांचा बादशाह ए. आर. रहमानचे नाव कॅनडातील आणखी एका रोडला नाव देण्यात आले आहे. रहमानने इंस्टाग्रामच्या माध्यमातून फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे.

कॅनडाच्या मरखम शहरातील एका रस्त्याला ए. आर. रहमान यांचं नाव देण्यात आला आहे. त्याचं नाव देत यावेळी त्याचा सन्मानही करण्यात आला आहे. कॅनडामधील रस्त्याला नाव देण्याची ही पहिली वेळ नाही, यापूर्वी ए. आर. रहमानचं नाव २०१३ मध्ये कॅनडातील एका रस्त्याला नाव देण्यात आले होते. त्याने ट्वीटच्या माध्यमातून आपल्या नावाची पाटी रस्त्याला लावलेली पाहून त्याने त्याचा आनंद व्यक्त केला.

यावेळी कार्यक्रमाला कॅनडाचे महापौर देखील उपस्थित होते. या कार्यक्रमात त्याने कॅनडाच्या महापौरांचे आभार मानले असून आपल्या भावना व्यक्त केल्या. ए.आर. रहमानने सोशल मीडियावर कॅनडाच्या महापौरांबरोबरचा फोटो शेअर करत, 'मरखम शहर, फ्रँक स्कारपिटी आणि कॅनडाच्या नागरिकांनी माझा सन्मान केला यासाठी मी त्यांचा आभारी आहे.' अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

ए. आर. रहमानचा भारतातही अनेकदा सन्मान करण्यात आला आहे. ए.आर. रहमान दिग्दर्शित 'मस्क' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रहमान सध्या अभिनेता चियान विक्रम यांच्या 'कोब्रा' या चित्रपटाच्या कामात व्यग्र असून मणिरत्न या सिनेमालाही ए.आर. रहमान संगीत देणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: बारामतीमध्ये अजित पवारांच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष करायला सुरुवात

Healthy Breakfast: नाश्त्यासाठी बनवा कमी साहित्याचा 'हा' पौष्टीक पदार्थ

Chopda Vidhan Sabha : निवडणुकीचे काम टाळणाऱ्या २१ कर्मचाऱ्यांवर गुन्हा; विनापरवानगी राहिले गैरहजर

Assembly Election Results 2024 : राज्यात कोणाचं सरकार येणार? सुरुवातीच्या कलात महायुती आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: बहुमताचा आकडा गाठला, सुरुवातीचा कल महायुतीकडे, भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत!

SCROLL FOR NEXT