Shah Rukh Khan And John Abraham On Press Conferance Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shah Rukh Khan kisses John Abraham: शाहरूख खाननं गालावर किस केलं अन् 'तो' लाजून चूर झाला...वाचा नेमकं काय घडलं?

शाहरुख खान आणि जॉन अब्राहम यांच्या मैत्रीचा धम्माल किस्सा यावेळी सर्वांनाच पाहायला मिळाला.

Chetan Bodke

Shah Rukh Khan kisses John Abraham: २५ जानेवारीला 'पठान' चित्रपट प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. चित्रपटाने आता पर्यंत ५०० कोटींपेक्षा अधिक बॉक्स ऑफिसवर कमाई केली आहे. पण भारतात आतापर्यंत २८० कोटींच्या आसपास चित्रपटाने कमाई केली आहे. चित्रपटाला मिळालेल्या घवघवीत यशानंतर चित्रपटातील सर्व कलाकार माध्यमांसमोर आले होते, त्यावेळी त्यांनी अनेक शुटिंगचे किस्से सांगितले.

शाहरुख खान आणि जॉन अब्राहम यांच्या मैत्रीचा धम्माल किस्सा यावेळी सर्वांनाच पाहायला मिळाला. शाहरुख म्हणतो, "जॉनची बॉडी पाहुन मलाही बॉडी करायची होती. आमचे थरारक ऍक्शन सिक्वेन्स चित्रपटात तुम्हाला पाहायला मिळेल. जॉनने सुद्धा मला वर्क आऊट करायला शिकवलं. माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे.

शुटिंग दरम्यान आम्ही इतके जवळ आले होतो की, आम्ही एकमेकांना किस केलं असतं. हे एकतर्फी प्रेम नाही तर जॉन सुद्धा माझ्यावर तेवढेच नेहमी प्रेम करतो." असं शाहरुख खान पत्रकार परिषदेत गंमतीत म्हणतो.

शाहरुख पुढे म्हणतो,"जॉन ऍक्शन सिक्वेन्स करताना खूप काळजी घेतो. आपल्यामुळे दुसऱ्याला लागणार नाही याची काळजी त्याने शुटिंग दरम्यान घेतली. ऍक्शन करताना जॉन अनेक रिहर्सल करतो" असं शाहरुख म्हणतो. जॉनने सुद्धा शाहरुखबद्दल एक महत्वाचं वाक्य वापरलं, "शाहरुख खान हा अभिनेता नाही तर ती एक भावना आहे" अशाप्रकारे पठान च्या पत्रकार परिषदेत जॉन आणि शाहरुख यांचा धम्माल अंदाज पाहायला मिळाला.

या कार्यक्रमादरम्यान, जॉन जिममधील अनुभव सांगत होता. जॉन म्हणतो, 'जिम मस्त आहे...' जेव्हा शाहरुख मागून येतो आणि त्याला किस करतो. शाहरुख म्हणतो, 'मी दीपिकाला अनेकदा किस केले पण जॉनसोबत हे पहिल्यांदाच घडले असून हे फार वेगळे आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nepal Prime Minister K.P. Sharma Oli resigns : नेपाळमध्ये सत्तापालट; पंतप्रधान ओलींचा राजीनामा

Maharashtra Live News Update: राष्ट्रवादी काँग्रेसचे नागपूरात राज्यस्तरीय एकदिवसीय चिंतन शिबिराचे आयोजन

RBI Recruitment: रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी; ऑफिसर पदासाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

Koli Community : कोळी समाजाला हैदराबाद गॅजेट लागू करा; महादेव, मल्हार कोळी समाज आक्रमक

गोकुळचा मोठा निर्णय! लवकरच चीज अन् आईस्क्रीम बाजारात आणणार; शेतकऱ्यांनाही दिलासा

SCROLL FOR NEXT