Salman Khan And Ranveer Singh Dance Video Instagram
मनोरंजन बातम्या

Anant- Radhika Music Ceremony : अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्यात रणवीर-सलमान बेधुंद होऊन नाचले, नवरदेवानेही धरला जबरदस्त ठेका

Salman Khan And Ranveer Singh Dance Video : राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांचा संगीत सोहळा पार पडला. या सोहळ्याला फक्त बॉलिवूडकरच नाही तर हॉलिवूड सेलिब्रिटींनीही उपस्थिती लावली होती.

Chetan Bodke

राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांचा संगीत सोहळा पार पडला. या सोहळ्याला फक्त बॉलिवूडकरच नाही तर हॉलिवूड सेलिब्रिटींनीही उपस्थिती लावली होती. गेल्या अनेक दिवसांपासून लग्नाची जगभरात चर्चा सुरू आहे.

नुकत्याच झालेल्या संगीत सोहळ्याला सलमान खान, विकी कौशल, दीपिका पादुकोण, कियारा अडवाणी, सिद्धार्थ मल्होत्रा, एम.एस.धोनी, श्रेयस अय्यरसह अनेक सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती. सध्या इन्स्टाग्रामवर बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खानचा संगीत कार्यक्रमातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये सलमान खान आणि रणवीर सिंग मनमुराद डान्स करताना पाहायला मिळत आहे.

सध्या सोशल मीडियावर राधिका- अनंत यांच्या संगीत सोहळ्यातील अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहे. गेल्या काही तासांपूर्वी हा व्हिडिओ 'विरल भयानी' या इन्स्टा चॅनलवर शेअर करण्यात आलेला आहे. सलमानच्या डान्सची सध्या इन्स्टाग्रामवर तुफान चर्चा होताना दिसत आहे. सलमानच्या २००० साली रिलीज झालेल्या 'हर दिल जो प्यार करेगा' चित्रपटातील 'ऐसा पहली बार हुआ है' गाण्यावर सलमान आणि रणवीर सिंग मनमुराद डान्स करताना दिसत आहे. या संगीत इव्हेंटचं आयोजन मुंबईच्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये करण्यात आले होते. नीता मुकेश अंबानी कल्चर सेंटरमध्ये या संगीत इव्हेंट पार पडला.

म्युझिक लाँचिंग इव्हेंटमध्ये, अनंतने ब्लू आणि सिल्व्हर कलरचा कुर्ता आणि ब्लॅक पायजमामध्ये दिसला. तर सलमान खान ब्लॅक कोट, शर्ट आणि पॅंटमध्ये दिसला. सध्या दोघांच्याही डान्सची सोशल मीडियावर जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. एका व्हिडिओमध्ये, कार्यक्रमामध्ये अनंत सलमानला त्याच्या शेजारी बसण्यासाठी बोलवतानाही दिसला. तर रणवीर सिंहने सलमानच्या 'नो एंट्री'च्या टायटल साँगवर जबरदस्त डान्स केला. यावेळी रणवीरने डान्ससाठी सिल्वर हार्फ टिशर्ट, डेनिम आणि स्नीकर्स असा लूक केला होता.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा भव्य विवाहसोहळा १२ ते १४ जुलै दरम्यान पार पडणार आहे. मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये अनंत- राधिका विवाहबंधनात अडकणार आहेत. या लग्नाला बॉलिवूड सेलिब्रिटीसोबतच क्रीडा तसेच बिझनेस क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळी हजेरी लावणार आहेत. या भव्य लग्नाचे कार्ड आधीच सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. १२ जुलैला भव्य दिव्य लग्न, १३ जुलैला शुभ आशीर्वाद सोहळा तर १४ जुलैला ग्रँड वेडिंग रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

Maharashtra Live News Update: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे शिवतीर्थावर जाणार

Breaking News : ऐन गणेशोत्सवात मोठी दुर्घटना; रोपवे तुटल्याने ६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT