Priyanka Chopra with her Daughter Malati Merry Jonas Chopra at Siddhivinayak Darshan Instagram @priyankachopra
मनोरंजन बातम्या

Priyanka Chopra At Siddhivinayak Temple: प्रियंकासह लेक मालतीही सिद्धिविनायकाच्या चरणी लीन; घेतले लाडक्या गणरायाचे दर्शन...

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि लेक मालती सोबत मुंबईतील सिद्धिविनायकाच्या मंदिरात दर्शनासाठी पोहोचली होती.

Chetan Bodke

Priyanka Chopra Took Siddhivinayak Darshan: बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि लेक मालती सोबत मुंबईतील सिद्धिविनायकाच्या मंदिरात दर्शनासाठी पोहोचली होती. तिचा हा सिद्धिविनायकाच्या मंदिरातील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यावेळी प्रियांका चोप्रा आणि मालतीकडे सर्वांच्याच नजरा खिळल्या होत्या.

प्रियांका चोप्रा सध्या मुंबईत आली आहे. ती नुकतीच नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या कार्यक्रमात देखील सहभागी झाली होती. सोबतच तिची चुलत बहिण परिणीती चोप्राच्या साखरपुड्याची देखील सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे, पण अद्याप तरी, परिणीती आणि राघव यांच्या रिलेशनची माहिती गुलदस्त्यातच आहे. 

प्रियांका चोप्रा मुलीसोबत सिद्धिविनायक मंदिरात जातानाच्या व्हिडीओ चांगल्याच व्हायरल झाल्या. त्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. प्रियांका चोप्राने हलक्या हिरव्या रंगाचा सलवार सूट परिधान केला होता. तर मालतीने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता.

प्रियांका चोप्रा आपल्या लाडक्या लेकीला कडेवर घेत सिद्धीविनायकाची पुजा करताना दिसत आहे. त्याचवेळी मंदिरातील पुजारीही त्यांना गंध लावताना दिसत आहेत. प्रियांका चोप्रा देखील फोटोमध्ये गणपती बाप्पासमोर फोटोसाठी पोज देताना दिसत आहे. यावेळी मालतीने देखील गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं.

प्रियांका चोप्रा 31 मार्च रोजी भारतात आली आहे. अलीकडेच तिच्या ‘सिटाडेल’ या वेबसिरीजचा ट्रेलरही लाँच करण्यात आला. लवकरच प्रियंका ‘जी ले जरा’ या चित्रपटातही दिसणार आहे. तिच्याशिवाय चित्रपटात प्रमुख भूमिकेत आलिया भट्ट आणि कतरिना कैफ यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. ‘सिटाडेल’ ही वेबसीरिज येत्या २८ एप्रिल रोजी विविध भाषांमध्ये प्रदर्शित होत आहे.

प्रियांका चोप्राची स्टाईल चाहत्यांना खूप आवडते. अलीकडेच तिने एका मुलाखतीत खुलासा केला होता की ती बॉलिवूडमधील राजकारणाची शिकार झाली आहे. त्यामुळे तिला चित्रपट मिळत नव्हते आणि त्याला अमेरिकेला जावे लागले. दरम्यान, ती आता अनेक हॉलिवूड तसेच बॉलिवूड प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नागपूरमध्ये राष्ट्रवादीचे भव्य चिंतन शिबिर, ५०० हून अधिक प्रतिनिधींचा सहभाग

BMC Recruitment: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी; या पदांसाठी भरती सुरु; आजच अर्ज करा

रत्नागिरीच्या MIDCमध्ये वेश्याव्यवसाय, पुण्यातील २ तरूणींच्या मदतीनं देहविक्री सुरू; पोलिसांकडून पर्दाफाश

Maharashtra : ७ महिन्यात १४ लाख मतदार वाढले, विरोधकांच्या मतचोरीच्या आरोपादरम्यान धक्कादायक आकडेवारी समोर; VIDEO

Deepika Padukone: ८ तासांची शिफ्ट की ५ स्टार ट्रीटमेंट; दीपिका पदुकोणने नक्की का घेतली 'कल्कि २८९८ एडी'मधून एक्झिट

SCROLL FOR NEXT