Court Issues Warrant Against Ameesha Patel: बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल फसवणूक प्रकरणी विरोधात कोर्टाने वॉरंट जारी केले आहे. चेक बाऊन्स प्रकरणी रांचीच्या दिवाणी न्यायालयाने अभिनेत्री आणि तिचा बिझनेस पार्टनर कुणालला विरोधात वॉरंट काढले आहे. या प्रकरणात 2.5 कोटींच्या फसवणुकीशी झाली आहे.
2018 मध्ये 'फॅमिली ऑफ ठाकूरगंज' चित्रपटाचे निर्माते अजय सिंह यांनी अभिनेत्री अमिषा पटेल विरोधात हा गुन्हा दाखल केला होता. अमिषा पटेलने म्युझिक व्हिडिओ बनवतो असे सांगून पैसे घेतल्याचा आरोप त्यांनी केला होता, पण ना म्युझिक व्हिडिओ बनला ना त्यांचे पैसे परत केले गेले.
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, आता रांची कोर्टाने अभिनेत्री अमिषा पटेल विरोधात वॉरंट काढले आहे. यासोबतच अभिनेत्रीविरोधात समन्सही बजावण्यात आले, तरीही ती किंवा तिचे वकील न्यायालयात हजर झाले नाहीत, यावरही न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. या प्रकरणी पुढील सुनावणी 15 एप्रिल 2023 रोजी होणार आहे.
निर्माता आणि तक्रारदार अजय सिंह यांनी संभाषणात सांगितले की त्यांचा आणि अमिषा पटेलचा करार झाला होता. त्यानुसार एका म्युझिक व्हिडिओवर काम करायचे होते. त्याला हे पैसे जून 2018 मध्ये व्याजासह परत करायचे असल्याचे या करारात स्पष्ट लिहिले होते. जेव्हा त्याने अभिनेत्रीकडे वारंवार पैसे मागितले तेव्हा अमीषाने 2.5 कोटींचा चेक दिला. आमिषाने दिलेला चेक बाऊन्स झाला. त्याचवेळी अजय सिंहने अमिषा पटेलचा बिझनेस पार्टनर कुणाल गुमरवर त्याला धमकावल्याचा आरोपही केला.
याआधी दखल अमिषावर असा आरोप करण्यात आला आहे. मध्य प्रदेशातील खांडवा येथे तिच्या विरोधात फसवणूक केल्या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
अमिषा पटेल सध्या 'गदर २' मुळे चर्चेत आहे. ती सनी देओलसोबत गदर २ मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचे काम सुरू झाले आहे, त्यामुळे स्टार्सनी आतापासूनच प्रमोशनची तयारी केली आहे. अनिल शर्मा दिग्दर्शित हा चित्रपट याच वर्षी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर देखील प्रदर्शित झाले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.