JNU Teaser Released Saam Tv
मनोरंजन बातम्या

JNU Teaser: 'जेएनयू' चित्रपटाचा धमाकेदार टीजर आऊट, तुम्ही पाहिला का?

Priya More

JNU: Jahangir National University Movie:

विनय वर्मा यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेला चित्रपट 'जेएनयू: जहांगीर नॅशनल यूनिवर्सिटी' (JNU: Jahangir National University)सध्या चांगलाच चर्चेत आहे. पोस्टरनंतर आज या चित्रपटाचा टीझर (JNU Teaser) रिलीज करण्यात आला आहे. सध्या सोशल मीडियावर जेएनयूचा टीजर धुमाकूळ घालत आहे.

'जेएनयू'च्या टीजरमध्ये चित्रपटाच्या कथेची झलक पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये निषेधाची दृश्ये, गुन्हेगारी कटाचे आरोप, देशद्रोहाचे आरोप आणि दहशतवाद समर्थक भावनांचे चित्रण करण्यात आले आहे. जेएनयू हा चित्रपट विद्यार्थी राजकारणावर आधारित आहे. या चित्रपटाचे काहींनी कौतुक केले आहे. तर काहींनी हा प्रपोगंडा असल्याचे म्हटले आहे. काहींनी तर चित्रपटाच्या नावावर देखील नाराजी व्यक्त केली आहे.

नुकताच रिलीज झालेल्या टीजरमध्ये वेगवेगळ्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांचे दोन गट असल्याचे दाखवण्यात आले आहे. काही जण 'लाल सलाम' तर काही 'जय श्री राम'च्या घोषणा देताना दिसतात. 'जहांगीर नॅशनल युनिव्हर्सिटी'मध्ये राजकारण आणि त्यासंबंधीचे अनेक मुद्दे टीजरमध्ये दाखवण्यात आले आहेत.

महाकाल मुव्हीज प्रायव्हेट लिमिटेडच्या बॅनरखाली निर्मित या चित्रपटाची निर्मिती जहांगीर नॅशनल युनिव्हर्सिटीच्या (जेएनयू) निर्मात्या प्रतिमा दत्ता यांनी केली असून दिग्दर्शन विनय शर्मा यांनी केले आहे.चित्रपटात उर्वशी रौतेला, पीयूष मिश्रा, रवि किशन, सिद्धार्थ बोडके, विजय राज, रश्मी देसाई, अतुल पांडे, सोनाली सेगल यासारखे प्रतिभावान कलाकार दिसणार आहेत . हा चित्रपट 5 एप्रिल 2024 रोजी रिलीज होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

SCROLL FOR NEXT