Bollywood Controversies On 2023 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bollywood Controversies On 2023: भगवी बिकिनी ते धर्मांतरापर्यंत, बॉलिवूडच्या या चित्रपटांमुळे झालाय तुफान राडा

Year Ender 2023: हे वर्ष बॉलिवूडमधील (Bollywood) अनेक चित्रपटांसाठी खास ठरले. काही चित्रपट इतके सुपरहिट ठरले की त्यांनी बॉक्स ऑफिससोबत जगभरामध्ये जबरदस्त कमाई केली. पण यामधील काही चित्रपट असे ठरले आहेत की त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला.

Priya More

Bollywood Movies 2023:

२०२३ या वर्षातला शेवटचा महिना म्हणजे डिसेंबर सध्या सुरू आहे. या वर्षाला निरोप देण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. नवीन वर्षाच्या स्वागताची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. हे वर्ष बॉलिवूडमधील (Bollywood) अनेक चित्रपटांसाठी खास ठरले. काही चित्रपट इतके सुपरहिट ठरले की त्यांनी बॉक्स ऑफिससोबत जगभरामध्ये जबरदस्त कमाई केली.

पण यामधील काही चित्रपट असे ठरले आहेत की त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. या चित्रपटांतील काही सिन्स, कपड्यांवर आक्षेप घेण्यात आला. यावरून आंदोलनं देखील झाली. आता यावर्षाचा शेवट करताना आपण यावर्षामध्ये कोणत्या चित्रपटांमुळे वाद निर्माण झाला होता त्यावर नजर टाकणार आहोत...

पठान -

२०२३ हे वर्ष बॉलिवूडचा 'बादशहा' अर्थात अभिनेता शाहरुख खानसाठी खूपच खास ठरलं आहे. यामागचे कारण म्हणजे शाहरुख खानचा 'पठान' आणि 'जवान' हे दोन चित्रपट सुपरहिट ठरले आणि त्यांनी जबरदस्त कमाई देखील केली. आता त्याचा आणखी एक बहुप्रतीक्षित चित्रपट 'डंकी' येत्या काही दिवसांमध्ये रिलीज होणार आहे. शाहरूख खानचा या वर्षातला पहिला चित्रपट पठानमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. या चित्रपटातील 'बेशरम रंग' या गाण्यामध्ये दीपिका पदुकोणने घातलेल्या भगव्या बिकिनीमुळे वाद निर्माण झाला. यामुळे आंदोलनं करण्यात आली, पोस्टर जाळण्यात आले होते. विरोध होऊन देखील या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली.

आदिपुरुष -

'बाहुबली' फेम प्रभासचा 'आदिपुरुष' हा चित्रपट यावर्षी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाने ६०० कोटींची कमाई केली असली तरी देखील त्याने प्रेक्षकांची निराशा केली. आदिपुरुषने सुरुवातीच्या काही दिवसांत खूप चांगली कमाई केली. पणनंतर सर्वांनी या चित्रपटातील संवादांपासून काही वादग्रस्त सिन्सवर आक्षेप घेतला. या चित्रपटावर बंदी घालण्यात यावी अशी देखील मागणी करण्यात आली होती. याप्रकरणी चित्रपटाचे लेखक मनोज मुंतशिर याने माफी देखील मागितली होती.

ओएमजी २ -

बॉलिवूडचा 'खिलाडी' अर्थात अभिनेता अक्षय कुमारच्या 'OMG' चित्रपटाच्या यशानंतर 'OMG 2' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. 'OMG 2' हा सेक्स सारख्या गंभीर विषयावर आधारित चित्रपट असून त्याला A प्रमाणपत्र देखील मिळाले आहे. या चित्रपटात अक्षय पुन्हा एकदा देवाच्या भूमिकेत दिसला. या चित्रपटाच्या पहिल्या भागात तो भगवान कृष्णाच्या भूमिकेत दिसला होता. तर यावेळी तो शंकराच्या रुपात पाहायला मिळाला. चित्रपटाच्या काही दृश्यांवरून बराच वाद झाला होता. पुजाऱ्यांनी या चित्रपटाच्या निर्मात्यांना लीगल नोटीस देखील पाठवली होती. या चित्रपटातील काही सिन्स काढून टाकण्यात आले होते. या चित्रपटाने २०० कोटींपर्यंत कमाई केली.

दे केरला स्टोरी -

सुदीप्तो सेन आणि विपुल शाह यांचा चित्रपट 'द केरला स्टोरी' या वर्षी प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या टीझर, पोस्ट आणि ट्रेलरवरून सुरू झालेला वाद चित्रपटाच्या प्रदर्शनापर्यंत कायम होता. अनेकांनी हा केवळ एका विशिष्ट समुदायाचा प्रचार असल्याचे म्हटले. त्याचवेळी अनेक राजकीय पक्षांनी याला कडाडून विरोध केला. मुस्लीम संघटना जमियत उलामा-ए-हिंदने चित्रपटाच्या कथेबाबत सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. सीबीएफसीकडून चित्रपट रद्द करण्याचा प्रयत्न केला. मात्र अनेक वादानंतरही चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला.

अ‍ॅनिमल -

नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या 'अ‍ॅनिमल' चित्रपटावरून देखील वाद निर्माण झाला आहे. काहींना या चित्रपटाची कथा आवडली तर काहींना नाही. या चित्रपटांमध्ये ज्याप्रकारे महिलांवरील हिंसाचार दाखवण्यात आला आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने प्रेक्षक संतापले आहेत. 'अ‍ॅनिमल'मध्ये मेरिटल रेप आणि एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर यासारख्या गोष्टी मोठ्या प्रमाणावर दाखवल्या गेल्या आहेत. तर खूप बोल्ड सीन्सही दाखवण्यात आले आहेत. यामुळे या चित्रपटाचा वाद संसदेपर्यंत पोहचला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिससोबत जगभरात देखील दमदार कमाई केली. हा चित्रपट सध्या एकापाठोपाठ एक रेकॉर्ड मोडत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Mega Block : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात रविवारी मेगा ब्लॉक; लोकल, एक्सप्रेस गाड्या धावणार उशिराने

Kolhapur Assembly Election: कोल्हापूरकरांनी आर्शीवादाचा 'हात' काढला, महायुतीला १० पैकी १० जागांवर साथ, मविआला धक्का

Ajit Pawar On Election Result: महायुतीच्या विजयाचा फॅक्टर काय? निकाल हाती येताच अजित पवारांनी सगळंच सांगितलं

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: पुण्यातील २१ विधानसभा मतदारासंघाचा निकाल पाहा एका क्लिकवर

Rice Dishes : संडे स्पेशल ब्रंच, बनवा 'या' खास पद्धतीचा राईस

SCROLL FOR NEXT