मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री तबस्सुम गोविल यांचं वयाच्या 78व्या वर्षी निधन झालं आहे. हृदयविकारचा झटका आल्याने त्यांचं निधन झालं. तबस्सुम या त्यांच्या 'फूल खिले गुलशन गुलशन' कार्यक्रमासाठी प्रसिद्ध होत्या.
तबस्सुम गोविल सिनेविश्वातील मोठं नाव. त्यांचा जन्म 9 जुलै 1944 रोजी अयोध्येत झाला. त्यांचे वडील अयोध्यानाथ सचदेव आणि असगरी बेगम हे स्वातंत्र्यसैनिक होते. मात्र, अभिनेत्रीचे शिक्षण मुंबईत झाले आहे. (Actress)
तबस्सूम यांचं Urdu भाषेवर प्रभुत्व होतं. काही काळ त्या दूरदर्शनवर कलाकारांच्या मुलाखतीचा कार्यक्रम फूल खिले हैं गुलशन गुलशन या शो देखील करत होत्या. (Latest Marathi News)
या शोमध्ये त्या सिनेजगताशी दिग्गजांशी खास संवाद साधत असत. त्यांच्या या शोला खूप प्रेम मिळाले. या कारणास्तव हा कार्यक्रम एक-दोन नव्हे तर तब्बल 21 वर्षे दूरदर्शनवर प्रसारित झाला. हा शो 1972 मध्ये सुरू झाला आणि 1993 पर्यंत चालला. त्यांच्या जाण्याने हिंदी सिनेसृष्टीवर शोखकळा पसरली आहे.
तबस्सुम यांनी लहान वयातच आपल्या सिनेकिर्दीला सुरुवात केली होती. त्यांनी वयाच्या तिसऱ्या वर्षीच रुपेरी पडद्यावर एन्ट्री घेतली होती. 1947 साली आलेल्या मेरा सुहाग सिनेमात त्यांना बालकलाकाराची भूमिका केली होती. तबस्सुम यांनी दीदास सिनेमात अभिनेत्री नरगिस यांच्या लहानपणीची भूमिका साकारली होती. त्यांच्या या भूमिकेचे कौतुक झालं होत. यानंतर त्या अनेक सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.