Stree 2 Public Review canva
मनोरंजन बातम्या

Stree 2 Public Review : हा तर यंदाचा सर्वोत्कृष्ट चित्रपट, श्रद्धा कपूरच्या 'स्त्री २'चे नेटकऱ्यांकडून कौतुक

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या स्री २ची उत्सुकता अनेक प्रेक्षकांना होती . आज म्हणजेच १५ ऑगस्ट रोजी चित्रपट प्रोक्षकांच्या भेटिला मोठ्या पडद्यावर प्रदर्शित करण्यास आला आहे. श्रद्धाच्या स्री चित्रपटाच्या अभिनयामुळे चाहत्यांकडून तिचे भरभरून कौतुक करण्यात आले होते. अनेक दिवसांपासून श्रद्धा स्री २च्या प्रमोशनसाठी सोशल मीडियावर सक्रिय दिसत होती त्यासोबतच तिनं अनेक रिअ‍ॅलिटी शोमध्ये सुद्धा चित्रपटामध्ये काय असु शकतं त्याची झलक सांगीली होती.

स्री २मध्ये नेमकं काय?

स्री २मध्ये श्रद्धा कपूर, राजकुमार राव, अभिषेक बनर्जी आणि पंकज त्रिपाठी या सारखे बॉलिवूड स्टार्स पुन्हा एकदा स्री २च्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर एकत्र पाहायल मिळत आहेत. स्त्री चित्रपटामध्ये आपल्याला स्त्री या पात्रा बद्दलची भीती पहायला मिळाली होती. मात्र आता, 'स्त्री 2'च्या माध्यमातून दहशत आणि कॉमेडी यांचा कॉंबो पाहायला मिळू शकतो. स्री २मध्ये स्री चंदेरी गावामधील पुरुषांना कशी भीती दाखवेल किंवा कशी पळवून लावणार हे पहाणं रंजक ठरणार आहे. स्री २मधील स्टोरीलाईल आणि कॉमेडी प्रेक्षकांना नेमकं कशी वाटली हे चाहत्यांकडून सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. चला जाणून घेऊया..

नेटकऱ्याकडून त्यांच्या सोशल मीडियावर स्त्री२ बद्दल अनेक प्रतिक्रिया देण्यात आले आहेत. अनेकांना स्त्री२मधील श्रद्धाचा अभिनय प्रचंड आवडलेला दिसतोय. अनेकांनी तर चित्रपटाला ४ स्टार देखील दिले आहेत. स्त्री २ यंदाच्या वर्षातील सर्वात 'बेस्ट हॉरर कॉमेडी चित्रपट' असल्याचे अनेक चहात्यांची प्रतिक्रिया आहे. हा यंदाच्या वर्षातील सर्वात हॉरर चित्रपट ठरतो असे देखील अनेकांनी सांगितले आहेत. काही प्रेक्षकांनी तर 'हॉरर चित्रपट आणि कॉमेडीचं खूप सुंदर असं उदाहरण' असे म्हंटले आहे.

स्त्री २ चित्रपटाचे दिग्दर्शन अमर कौशिक यांनी केलं असून त्यामध्ये हॉररआणि कॉमेडी याचा परफेक्ट ब्लॅंड प्रेक्षकांसमोर आणला आहे. स्त्री २ चित्रपटाचा बजेट हे २५ कोटी असल्याचं म्हटलं जातं आहे. आता स्त्री २ चाहत्यांकडून कसा प्रतिसाद मिळेल हे पाहण रंजक ठरेल.

Edited By: Nirmiti Rasal

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT