Shraddha Kapoor And Rahul Modi  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shraddha Kapoor आणि Rahul Modi यांचं रिलेशनशीप कन्फर्म, दोघांच्याही कुटुंबीयांना आवडली जोडी

Shraddha Kapoor And Rahul Modi Relationship: अनंत अंबानीच्या प्री-वेडिंगमध्ये श्रद्धा आणि राहुल एकत्र गेले होते. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. दोघे अनेकदा सार्जनिक ठिकाणी एकत्र येतात.

Priya More

Shraddha Kapoor And Rahul Modi:

'आशिकी' फेम श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) सध्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत आहे. श्रद्धा कपूरचे नाव 'तू जूती में मक्कर' चित्रपटाचा लेखक राहुल मोदीसोबत (Rahul Modi) जोडले जात आहे. हे दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. पण या दोघांनी अद्याप याबाबत अधिकृत घोषणा केली नाही. 'तू जूती में मक्कर' या चित्रपटामध्ये काम करता करता हे दोघं एकत्र आले असल्याचे सांगितले जात आहे. अनंत अंबानीच्या प्री-वेडिंगमध्ये श्रद्धा आणि राहुल एकत्र गेले होते. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. दोघे अनेकदा सार्जनिक ठिकाणी एकत्र येतात.

'हिंदुस्तान टाईम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, सूत्रानी सांगितले की 'तू जूती में मक्कर'या चित्रपटाच्या शूटिंगपासून त्यांचे नातं अधिक घट्ट झाले. चित्रपट पूर्ण झाल्यानंतर श्रद्धा आणि राहुल एकमेकांसोबत कम्फर्टेबल झाले. आता त्यांना लोकांसमोर एकत्र जाताना जराही संकोच वाटत नाही. त्यांना अद्याप त्यांचे नाते अधिकृत करण्याची घाई नाही. दोघेही प्रायव्हसीला महत्त्व देत आहेत आणि त्यांना आपले वैयक्तिक आयुष्य हेडलाइन्सपासून दूर ठेवायला आवडते.

सूत्राच्या हवाल्याने असेही सांगण्यात आले आहे की, दोघेही एकत्र फोटो क्लिक करण्यात अजिबात संकोच करत नाहीत. पण दोघांनीही आपल्या नात्याची अधिकृत घोषणा करण्याबाबत कोणताही विचार केलेला नाही. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये दोघेही जामनगरला गेले होते. मुंबई एअरपोर्टवर हे कपल एकत्र स्पॉट झाले होते. यावेळी श्रद्धाने राहुलची आदित्य रॉय कपूरशी ओळख करून दिली.

श्रद्धा आणि राहुल नेहमीच मीडियापासून सावध असतात. दोघेही कधीच कॅमेऱ्यासमोर येत नसायचे. पण आता हे कपल बिनधास्तपणे एकत्र कॅमेऱ्यासमोर येतात. गेल्या वर्षी दोघेही मुंबईत डिनर डेटवर दिसले होते. त्यानंतर दोघेही डेट करत असल्याची चर्चा सुरू झाली होती. सूत्रांनुसार, या कपलच्या कुटुंबाला त्यांची जोडी प्रचंड आवडते. 2022 मध्ये श्रद्धाने फोटोग्राफर रोहन श्रेष्ठसोबत ब्रेकअप केले होते. त्यानंतर राहुल मोदी तिच्या आयुष्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेचे वर्षभरात एकूण किती मिळाले पैसे?

Uday Samant : 'मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे'; उदय सामंतांची सुशील केडिया यांच्यावर संतापजनक प्रतिक्रिया

Kalyan- Shilphata Road: कल्याण-डोंबिवलीकरांची ट्रॅफिकमधून सुटका, पलावा पूल आजपासून सुरू

Sushil Kedia Controversy : मराठी शिकणार नाही म्हणणारे सुशील केडिया घाबरले; पोलिसांकडे केली सुरक्षेची मागणी

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे अमित शहांसमोर लाचार झाले, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल|VIDEO

SCROLL FOR NEXT