Dunki movie Instagram
मनोरंजन बातम्या

Dunki Special Screening: राष्ट्रपती भवनमध्ये 'डंकी'चे स्पेशल स्क्रिनिंग, चित्रपट टॅक्स फ्री करण्याची होतेय मागणी

Dunki Special Screening At Rashtrapati Bhavan: शाहरुख खानचा हा चित्रपट या वर्षातला तिसरा चित्रपट आहे. याआधी प्रदर्शित झालेल्या शाहरुख खानचा 'पठान' आणि 'जवान' सुपरहिट ठरले. 'डंकी' देखील सुपरहिट ठरेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Priya More

Dunki Movie:

बॉलिवूडचा (Bollywood) 'किंग खान' अर्थात अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) बहुप्रतीक्षित 'डंकी' चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. शाहरुख खानचा हा चित्रपट या वर्षातला तिसरा चित्रपट आहे. याआधी प्रदर्शित झालेल्या शाहरुख खानचा 'पठान' आणि 'जवान' सुपरहिट ठरला.

या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिससह जगभरात चांगली कमाई केली. आता शाहरुखच्या डंकीला देखील प्रेक्षक चांगला प्रतिसाद देत आहेत. या चित्रपटाने ३५ कोटींची जबरदस्त ओपनिंग केली. आतापर्यंत या चित्रपटाने १२५ ते १३० कोटींची कमाई केली आहे. त्याचसोबत या चित्रपटाला IMDb वर देखील चांगले रेटिंग मिळाले आहे.

शाहरुख खानच्या या चित्रपटाबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. शाहरुख खानसोबत या चित्रपटाच्या संपूर्ण टीमसाठी ही गोष्ट खूपच खास आहे. राष्ट्रपती भवनामध्ये डंकी चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग करण्यात आले. एएनआयच्या वृत्तानुसार, रविवारी म्हणजेच 24 डिसेंबर रोजी राष्ट्रपती भवनात शाहरुख आणि तापसीच्या 'डिंकी' चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते.

चित्रपटाच्या टीमने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी राष्ट्रपती भवनात 'डिंकी' स्पेशल स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते. चित्रपटाची कथा अतिशय समर्पक आहे जी बेकायदेशीर स्थलांतरित आणि परदेशातील भारतीयांच्या परिस्थितीवर आवाज उठवते. त्याचवेळी ही बातमी समोर आल्यानंतर शाहरुख खानच्या चाहत्यांना देखील प्रचंड आनंद झाला. ते सोशल मीडियावर याबाबत आनंद व्यक्त करत आहेत. यासोबतच ते चित्रपट ट्रक्स फ्री करण्यात यावा अशी मागणी करत आहेत.

दरम्यान, शाहरुख खानच्या चित्रपटानंतर साऊथचा सुपरस्टार प्रभासचा 'सालार' चित्रपट प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर सध्या या दोन्ही चित्रपटांची टक्कर होत आहे. या दोन्ही चित्रपटाला जरी चांगला प्रतिसाद मिळत असला तरी देखील डंकीपेक्षा प्रभासच्या सालारची कमाई चांगली आहे. शनिवारी KGF दिग्दर्शक प्रशांत नील यांच्या 'सालार' ने सर्व भाषांमध्ये 57.61 कोटी रुपयांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने तब्बल 112 कोटींची कमाई केली. 'सालार'ने आतापर्यंत जगभरात 243 कोटींची कमाई केली आहे.या चित्रपटात पृथ्वीराज सुकुमारन, श्रुती हासन, जगपती बाबू, बॉबी सिम्हा, ईश्वरी राव आणि श्रिया रेड्डी यांसारखे दाक्षिणात्य कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT