Shah Rukh Khan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shah Rukh Khan B'day: 'किंग खान'ला शुभेच्छा देणं पडलं महागात, 'मन्नत'बाहेर शाहरूखच्या फॅन्ससोबत नेमकं काय घडलं?

Mobile Phone Stolen Outside Mannat: फक्त मुंबईतूनच नाही तर पुणे, कोल्हापूर, सांगली, नांदेड या शहरांसह देशभरातील हजारो चाहते मन्नतबाहेर आले होते.

Priya More

Mobile Phone Stolen Outside Mannat:

बॉलिवूडचा (Bollywood) 'किंग खान' अर्थात अभिनेता शाहरूख खानने (Shah Rukh Khan) २ नोव्हेंबरला आपला ५८ वा वाढदिवस साजरा केला. शाहरूख खानच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी 'मन्नत' बंगल्याबाहेर मोठी गर्दी केली होती.

फक्त मुंबईतूनच नाही तर पुणे, कोल्हापूर, सांगली, नांदेड या शहरांसह देशभरातील हजारो चाहते मन्नतबाहेर आले होते. पण या सर्व चाहत्यांना शाहरूख खानला शुभेच्छा देण्यासाठी येणं महागात पडलं आहे. कारण या शाहरूख खानच्या १७ चाहत्यांचे मोबाइल चोरीला गेले आहेत. गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी शाहरुखच्या चाहत्यांचे मोबाईल लंपास केले आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

याप्रकरणी वांद्रे पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. कोल्हापुरात राहणारा आलोक कुमार हा तरूण शाहरूखचा मोठा चाहता आहे. शाहरुख खानला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठई तो मुंबईत आला होता. पण मन्नतबाहेर झालेल्या मोठ्या गर्दीत त्याचा मोबाइल हरवला. त्याने माध्यमांशी बोलताना सांगितले की, 'गर्दीत माझा मोबाइल हरवला. दुपारी १२.४५ वाजता मी गर्दीतून बाहेर आलो. तेव्हा मला कळले की माझा फोन हरवला आहे. त्यानंतर मी वांद्रे पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार केली.'

फक्त या तरुणाचाच नाही तर त्याच्यासोबत इतर १७ जणांचा देखील मोबाइल चोरीला गेले आहेत. यासर्वांमध्ये पत्रकार अरबाज वाहिद खान यांचा देखील समावेश आहे. त्यांचा महागडा मोबाइल चोरीला गेला आहे. त्यासोबत विनय वानखेडे, गुलाम कामरा, ध्रुव कोठारी, आयुष गाला, सुशील मोहिते, मनजीत तुषारकांती, संजय हलदर, अब्बास झगा, समीर इमाम, राज वोहरा, अल्काश ताडे, दिल सिंग, प्रिया राय या सर्वांचे मोबाइल मन्नतबाहेर चोरीला गेले आहेत. या सर्वांनी वांद्रे पोलिसत याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

शाहरुख खानचा वाढदिवस म्हणजे त्याच्या चाहत्यांसाठी एकाद्या सणापेक्षा कमी नाही. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील शाहरुखच्या अनेक चाहत्यांनी त्याला शुभेच्छा देण्यासाठी मन्नतबाहेर मोठी गर्दी केली होती. या सर्व चाहत्यांनी मन्नतबाहेर फटाक्यांची आतिषबाजी करत दिवाळीसारखा जल्लोष केला. यावेळी शाहरुख खानने देखील आपल्या बंगल्याच्या टेरेसवर येत चाहत्यांचे आभार मानले. यावेळी शाहरुखला शुभेच्छा देण्यासाठी मन्नतबाहेर चाहत्यांनी गेलेली गर्दी पाहून चोरट्यांनी याठिकाणी हातसाफ करत मोबाइल चोरले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची मोठी गर्दी, बँकेबाहेर दिसल्या भल्यामोठ्या रांगा

Nandurbar : चिमुकल्या विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास; नेसू नदीवर पूल नसल्याने पुरातून काढावा लागतो मार्ग

Maharashtra Live News Update : मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांची नोटीस

Political News : मराठी माणसांना भडकावून मते मिळवणे हाच ठाकरेंचा उद्देश; शिंदे गटाची आगपाखड

Sharad Pawar: महाराष्ट्रात शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचे राज्य पुन्हा उभे करावे लागेल- शरद पवार|VIDEO

SCROLL FOR NEXT