Salman Khan And Katrina Kaif  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Salman Khan On Tiger 4: खरंच सलमान खानचा 'टायगर 4' येतोय का?, वर्ल्डकप फायनलमध्ये स्वत: अभिनेत्याने दिली हिंट

Salman Khan Video: सलमान खानने आयसीसी वर्ल्डकप २०२३ च्या अंतिम सामन्यात आपल्या चित्रपटाचे प्रमोशन केले.

Priya More

Tiger 3 Movie:

बॉलिवूडचा (Bollywood) 'सुलतान' अर्थात अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) बहुप्रतीक्षित चित्रपट 'टायगर ३' (Tiger 3 Movie) नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत बक्कळ कमाई केली. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने भारतामध्ये आतापर्यंत २२० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.

याचदरम्यान, सलमान खानने आयसीसी वर्ल्डकप २०२३ च्या अंतिम सामन्यात आपल्या चित्रपटाचे प्रमोशन केले. सलमान खानसोबत कतरिना कैफही दिसली. यावेळी सलमान खानने चाहत्यांना गुडन्यूज देखील दिली. सलमान खानने चाहत्यांना 'टायगर ४' ची हिंट दिली आहे.

सलमान खानने नुकताच चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वर्ल्डकप २०२३ च्या अंतिम सामन्यादरम्यान सलमान खान 'टायगर ४' विषयी बोलला. सलमान खानचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. टायगर ४ बद्दल ऐकून सलमान खानचे चाहते खूपच आनंदी झाले आहेत.

सलमान खान, कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी यांचा 'टायगर ३' चित्रपट रिलीज झाल्यापासून 'टायगर ४'ची चर्चा सुरू झाली आहे. अशातच सलमान खानने 'टायगर ४' बाबतचे अपडेटही दिले आहेत. वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यावेळी त्याने 'टायगर ४' संदर्भात हिंट दिली. त्यानंतर आता 'टायगर ४' बद्दल जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

आयसीसी वर्ल्डकप २०२३ च्या अंतिम सामन्यादरम्यान, सलमान खान आणि कतरिना कैफ यांनी विराट कोहलीच्या कारकिर्दीबद्दल चर्चा केली. दरम्यान सलमान खान बोलला. 'टायगर १' ते 'टायगर ३' पाहिल्याचे सांगितले. तेही वयाच्या ५७ व्या वर्षी. आता 'टायगर ४' ची ६० व्या वर्षी वाट पाहा. सलमान खानच्या या व्हिडिओनंतर 'टायगर ४'ची चर्चा सुरू झाली. सलमान खानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, सलमान खानचा 'टायगर ३' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने अवघ्या काही दिवसांमध्येच २०० कोटींचा टप्पा पार केला आहे. आता हा चित्रपट २५० कोटींचा पल्ला गाठण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. या चित्रपटात सलमान खानसोबत कतरिना कैफ आणि इम्रान हाश्मी हे मुख्य भूमिकेत आहेत. त्याचबरोबर या चित्रपटातील शाहरुख खानच्या कॅमिओने प्रेक्षकांची मनं जिंकली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

SCROLL FOR NEXT