Tiger 3 Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Tiger 3 Advance Booking : रिलीजपूर्वीच 'टायगर ३'ने केली १ कोटींची कमाई, आतापर्यंत विकले गेले इतके तिकीट

Tiger 3 Movie Advance Booking Income: या चित्रपटाचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू झाले आहे.

Priya More

Tiger 3 Movie:

बॉलिवूडचा (Bollywood) 'सुलताना' अर्थात अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि कतरिना कैफचा (Katrina Kaif) बहुप्रतीक्षित 'टायगर ३' चित्रपट (Tiger 3 Movie) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाबाबत दोघांचे देखील चाहते खूपच उत्सुक आहेत.

प्रेक्षकांमध्ये 'टायगर ३'ची क्रेझ इतकी आहे की या चित्रपटाने रिलीज होण्यापूर्वीच १ कोटींच्या कमाईचा आकडा पार केला आहे. या चित्रपटाचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग (Tiger 3 Advance Booking) सुरू झाले असून आतापर्यंत निर्मात्यांनी ३३ हजारांपेक्षा जास्त तिकीटं विकली आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

टायगर ३ चित्रपटाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला ५ नोव्हेंबर म्हणजे आजपासून सुरूवात झाली. देशातील काही मोठ्या शहरांमध्ये अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे. अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून निर्मात्यांनी चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच १ कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांसाठी ही एक मोठा दिलासा देणारी बातमी आहे.

आगाऊ बुकिंगवरूनच हा चित्रपट पहिल्या दिवशी किती कलेक्शन करू शकतो याचा अंदाज येऊ शकतो. अ‍ॅडव्हान्स बुकिंगवरून सलमान खान येत्या काही दिवसांत चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. या चित्रपटामध्ये सलमान खान व्यतिरिक्त कतरिना कैफ आणि इम्रान हाश्मी मुख्य भूमिकेत आहेत. तर शाहरुख खान आणि हृतिक रोशन कॅमिओ करताना दिसणार आहेत. 'टायगर 3' चित्रपटाचे दिग्दर्शन मनीष शर्मा यांनी केले आहे.

ट्रेड अ‍ॅनालिस्ट तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत टायगर ३ च्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगची माहिती शेअर केली आहे. त्यांनी या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, 'एक्सक्लुसिव्ह... टायगर ३ ची उत्तम सुरुवात. टायगर ३ चे अॅडव्हान्स बुकिंग जोरात सुरू झाले आहे. रविवारी PVRInox: २०,००० तिकीटं विकली गेली. Cinepolis: ३,८०० तिकीटं विकली गेली. एकूण २३,८०० तिकीट विकली गेली. पूर्ण अॅडव्हान्स बुकिं अद्याप सुरू झाले नाही. पण सलमानची क्रेझ सुरू झाली आहे. टायगर ३ चे शो सकाळी ७ वाजल्यापासून सुरू होतील. BookMyShow नुसार मुंबई सारख्या शहरांमध्ये सर्वात पहिला शो सकाळी ६.५ वाजता पाहता येईल.

'टायगर ३' फ्रँचायझीचा तिसरा पार्ट आहे. मनीश शर्मा दिग्दर्शित हा चित्रपट यशराज फिल्म्सच्या 'एक था टायगर' (२०१२) आणि 'टायगर जिंदा है' (२०१७) नंतरचा यशराज फिल्म्स स्पाई यूनिव्हर्सचा पार्ट आहे. सलमान आणि कतरिना या चित्रपटात एजंट टायगर आणि झोयाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात इम्रान हाश्मी देखील आहे जो यावेळी विलनच्या भूमिकेत दिसणार आहे. टायगर 3 मध्ये शाहरुख खान आणि हृतिक रोशन केमिओ करणार आहेत. या चित्रपटात शाहरुख पठान या त्याच्या आयकॉनिक पात्राच्या भूमिकेत दिसणार आहे. टायगर ३ चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर १२ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT