Tiger 3  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Tiger 3 Box Office Collection Day 1: बॉक्स ऑफिसवर फुटला 'टायगर ३'चा बॉम्ब, पहिल्याच दिवशी इतकी कमाई करत केला रेकॉर्ड सेट

Salman Khan And Katrina Kaif Tiger 3 Movie: या चित्रपटाने रिलीजच्या दिवशीच रेकॉर्डब्रेक कमाई करत नवा रेकॉर्ड सेट केला आहे.

Priya More

Tiger 3 Movie:

बॉलिवूडचा (Bollywood) 'सुलतान' अर्थात अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) बहुप्रतीक्षित 'टायगर ३' चित्रपट (Tiger 3 Movie) दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर रविवारी प्रदर्शित झाला. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर त्यांची प्रतीक्षा रविवारी संपली. हा चित्रपट पाहण्यासाठी सलमान खानच्या चाहत्यांनी थिएटरबाहेर मोठी गर्दी केली होती. टायगरने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटाने रिलीजच्या दिवशीच रेकॉर्डब्रेक कमाई करत नवा रेकॉर्ड सेट केला आहे.

सलमान खान आणि कतरिना कैफचा बहुप्रतीक्षित स्पाय थ्रिलर चित्रपट दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. टायगर फ्रँचायझीच्या तिसऱ्या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर अप्रतिम कामगिरी करून दाखवली असून जबरदस्त कमाई केली आहे. नुकताच समोर आलेल्या अहवालांवर विश्वास ठेवला तर, वायआरएफच्या स्पाय थ्रिलर चित्रपट 'टायगर ३' ने पहिल्या दिवशी ४४.५० कोटींची कमाई केली आहे.

व्हायरल रिपोर्ट्सनुसार, सलमान खानच्या 'टायगर ३' ने पहिल्या दिवशी ४० कोटींपार कमाई करत विक्रम रचला आहे. तसेच टायगर हा ३ वर्षांतील चौथा मोठा चित्रपट ठरला आहे ज्याने पहिल्याच दिवशी ४० कोटींहून अधिक कमाई केली आहे. टायगर ३ ने सनी देओलच्या गदर २ चा देखील रेकॉर्ड ब्रेक केला आहे. गदर २ ने पहिल्या दिवशी ४०.१० कोटींची कमाई केली होती. तर सलमानच्या टायगर ३ ने पहिल्या दिवशी ४४.५० कोटींची कमाई केली आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुंबई, दिल्ली-एनसीआर, पुणे आणि बेंगळुरूमध्ये 'टायगर ३' पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांनी सर्वाधिक गर्दी केली होती.

'टायगर ३' मधील सलमान खानच्या धांसू एन्ट्रीपासून ते कतरिना कैफच्या जबरदस्त अ‍ॅक्शनपर्यंत सर्वकाही 'टायगर ३' मध्ये पाहायला मिळेल. इमरान हाश्मीने त्याच्या ग्रे-शेडेड अवताराने प्रेक्षकांना प्रभावित केले आहे. 'टायगर ३'मध्ये सलमान खानच्या अ‍ॅक्शनसोबतच शाहरुख खान आणि हृतिक रोशनचे कॅमिओ देखील पाहायला मिळत आहेत. 'टायगर ३'चे दिग्दर्शन मनीष शर्मा यांनी केले असून चित्रपटाचे लेखन आदित्य चोप्राने केले आहे. सध्या सगळीकडे 'टायगर ३' या चित्रपटाची हवा पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT