Ranbir Kapoor  Saam TV
मनोरंजन बातम्या

Ranbir Kapoor: रणबीर कपूरने 'रामायण'साठी सोडलं नॉनव्हेज, नेमकं काय आहे कारण?

Priya More

Ramayan Movie:

बॉलिवूडचा (Bollywood) सुपरस्टार रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या 'रामायण' चित्रपटामुळे चर्चेत आहे. रणबीर कपूर बॉलिवूडचा असा अभिनेता आहे एखाद्या पात्राला परफेक्ट करण्यासाठी खूप मेहनत घेतो.

नितीश तिवारी यांच्या 'रामायण' चित्रपटामध्ये रणबीर कपूर भगवान रामाची भूमिका साकारणार आहे. याबाबत अद्याप रणबीर कपूर आणि नितीश तिवारी यांनी अधिकृत घोषणा केली नाही. याचदरम्यान अशा चर्चा होत आहे की, रणबीर कपूरने रामायण चित्रपटासाठी आपली लाईफस्टाईल बदलली आहे.

कोई मोईच्या रिपोर्टनुसार, रणबीर कपूरने नॉनव्हेज खाणं आणि मद्यपान करणं सोडून दिलं आहे. भगवान रामाची भूमिका व्यवस्थित पद्धतीने साकारता यावी यासाठी रणबीरने हा मोठा नर्णय घेतला आहे. आपलं पूर्ण लक्ष या भूमिकेवर केंद्रित करण्यासाठी आणि मनापासून काम करता यावे यासाठी त्याने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

या चित्रपटामध्ये रणबीरसोबत आलिया भट देखील मुख्य भूमिकेत असल्याची चर्चा सुरू होती. आलिया भट या चित्रपटात सीतेची भूमिका साकारू शकते असं सांगितले जात होते पण ती माहिती चूकिची होती. या चित्रपटामध्ये रणबीरसोबत साऊथची अभिनेत्री साई पल्लवी सीतेची भूमिका साकारणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर या चित्रपटात रावणाची भूमिका केजीएफ स्टार यश साकारणार असल्याचे बोलले जात आहे.

रामायण चित्रपटाची शूटिंग पुढच्या वर्षी म्हणजे २०२४ पासून होणार आहे. या चित्रपटाचा संपूर्ण फोकस राम आणि सीतावर असणार आहे. ऑगस्ट २०२४ पर्यंत या चित्रपटाचे शूटिंग सुरू राहणार आहे. या चित्रपटाचे व्हीएफएक्स ऑस्कर विजेती कंपनी करणार असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, अभिनेता रणबीर कपूर संदीप रेड्डी वंगा यांनी ‘ॲनिमल’ चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन आणि संपादन केले आहे. रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. त्यांच्यासोबत तृप्ती डिमरी, अनिल कपूर आणि बॉबी देओलही या चित्रपटात दिसणार आहेत. हा चित्रपट १ डिसेंबर २०२३ ला प्रदर्शित होणार आहे. याआधी हा चित्रपट ११ ऑगस्टला रिलीज होणार होता. मात्र पोस्ट-प्रॉडक्शनच्या कामात उशीर झाल्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi In Thane: मराठी, मेट्रो अन् मविआ; ठाण्यात PM मोदींची विरोधकांवर चौफेर टीका

Pune Devi Temple : मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे जम्मूच्या वैष्णो देवी मंदिराची प्रतिकृती

VIDEO : उद्धव ठाकरेंचा मोदी-शिंदेंवर 'ठाकरी बाण'

Marathi News Live Updates : काँग्रेसची ज्या राज्यात सत्ता येते ती राज्य उध्वस्त होतात, नरेंद्र मोदी

Fashion Tips : बॅगी जीन्ससोबत ट्राय करा 'हे' टॉप्स, फॅशन ट्रेंडमध्ये दिसाल स्टायलिश!

SCROLL FOR NEXT