Rakul Preet Singh And Jackky Bhagnani  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rakul-Jackky Wedding: रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी लग्नासाठी गोव्यात दाखल, कूल लूकमधील व्हिडीओ व्हायरल

Rakul Preet Singh And Jackky Bhagnani Wedding: रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी शनिवारी रात्री गोवा एअरपोर्टवर पोहचले. यावेळी दोघेही कूल लुकमध्ये दिसले. त्यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Priya More

Rakul Preet Singh And Jackky Bhagnani:

बॉलिवूडमधील सर्वांचे आवडते कपल म्हणजे अभिनेत्री रकुल प्रीत सिंग (Rakul Preet Singh) आणि जॅकी भगनानी (Jackky Bhagnani) सध्या चर्चेत आहे. कपल लवकरच विवाहबंधनात (Rajul-Jackky Wedding) अडणार आहेत. रकुल प्रीत सिंग येत्या २१ फेब्रुवारीला गोव्यामध्ये जॅकी भगनानीसोबत (jackky bhagnani) लग्न करणार आहे. सध्या या कपलचे प्री-वेडिंग फंक्शन सुरू आहेत. अशातच लग्नासाठी हे कपल शनिवारी रात्री गोव्यामध्ये दाखल झाले. गोवा एअरपोर्टरील या कपलचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी शनिवारी रात्री गोवा एअरपोर्टवर पोहचले. यावेळी दोघेही कूल लुकमध्ये दिसले. रकूलने ऑरेंज कलरचे ब्लेझर, पिंक कलरचे ब्लालेट आणि व्हाइट कलरचे स्नेकर्स घातले होते. तर जॅकी भगनानीने ग्रे कलरचा प्रिंटेट शर्ट आणि ब्लॅक कलरची पँट परिधान केली होती. या लूकमध्ये हे कपल खूपच सुंदर दिसत होते. यावेळी एअरपोर्टवर असलेल्या दोघांच्याही चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

लग्नासाठी गोव्याला जाण्यापूर्वी रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांनी प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. बाप्पाचे दर्शन घेऊन त्यांनी पूजा देखील केली. यावेळी दोघेही खूपच क्युट दिसत होते. त्यांचा यावेळीचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. रकुलने पिंक कलरचा एथनिक ड्रेस परिधान केला होता. तर जॅकीने पिस्ता कलरचा कुर्ता आणि पँट परिधान केली होती. कारमधून उतरून हे जोडपे मंदिरात दाखल झाले. या जोडप्याला पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी झाली होती.

दरम्यान, रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी गोव्यातील मित्र परिवार आणि कुटुंबीयांमध्ये इको-फ्रेंडली लग्न करणार आहेत. 19 फेब्रुवारीपासून त्यांच्या लग्नसोहळ्याच्या विधींना सुरूवात होणार आहे. रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांचा 21 फेब्रुवारीला पारंपारिक विवाह होणार आहे. रकुल आणि जॅकी लग्नानंतर 22 फेब्रुवारीला मुंबईत ग्रँड रिसेप्शन आयोजित करणार आहेत. या रिसेप्शनमध्ये बॉलिवूडपासून ते साऊथ इंडस्ट्रीतील बडे स्टार्स हजेरी लावू शकतात. रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी यांनी ऑक्टोबर 2021 मध्ये त्यांचे नात्या नात्याची अधिकृत घोषणा केली होती. यानंतर हे जोडपे अनेकदा सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमांमध्ये आणि पार्ट्यांमध्ये एकत्र दिसू लागले.

दरम्यान, ई टाइम्सच्या वृत्तानुसार, रकुल प्रीत आणि जॅकी भगनानी हे लग्नानंतर हनीमूनला जाणार नाहीत. अभिनेत्री तिच्या लग्नाच्या ३ दिवस आधीपर्यंत काम करणार आहे आणि लग्नाच्या सुमारे एक आठवड्यानंतर ती एका नवीन बॉलिवूड चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. मात्र, त्या चित्रपटात तिचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही. पण ती या चित्रपटामध्ये दिसणार असल्याची चर्चा होत आहे. तर जॅकी भगनानी अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांच्या 'बडे मियाँ और छोटे मियाँ' या चित्रपटात व्यस्त असेल. कारण निर्माता म्हणून हा त्याचा मोठा चित्रपट असणार आहे. अशा परिस्थितीत दोघेही त्यांचे हनिमून प्लॅन रद्द करू शकतात आणि कामातून ब्रेक घेऊन नंतर हनिमूनचे प्लॅन करू शकतात असे सांगितले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Sunday : घराच्या जमिनीचे आणि प्रेमाचे प्रश्न सुटणार, वाचा रविवारचे राशीभविष्य

Ind vs Eng, 5th Test, Day 3: जैस्वालचा 'यशस्वी' धमाका, जडेजा, वॉशिंगटनची 'सुंदर' खेळी, भारताचं इंग्लंडला 374 धावांचं आव्हान

Pigeons: मुंबईतील कबुतरखान्यावरून नवा वाद; नेमकं कारण काय? मुंबईत किती आहेत कबुतरखाने?

Raj Thackeray : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना हिंदीचा कळवळा; शेकापच्या मेळाव्यातून राज ठाकरेंचा हल्ला, VIDEO

Mumbai Crime : एकनाथ शिंदेंकडे तक्रार केली, तर...; 5 लाखांची खंडणी घेताना माजी नगरसेवकाला रंगेहाथ पकडलं

SCROLL FOR NEXT