Parineeti Chopra Birthday Saam Tv
मनोरंजन बातम्या

Parineeti Chopra Birthday: बँकेत नोकरी करणारी परिणीती चोप्रा अशी बनली बॉलिवूड अभिनेत्री, वजन कमी करण्यासाठी केला १० लाखांचा खर्च

Parineeti Chopra Birthday Special : परिणीती चोप्राच्या वाढदिवसानिमित्त आज आपण तिच्या आयुष्याशी संबंधित बऱ्याच रंजक गोष्टी जाणून घेणार आहोत...

Priya More

Happy Birthday Parineeti:

बॉलिवूडची (Bollywood) 'चुलबुली गर्ल' आणि 'परी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री परिणीती चोप्रा (Actress Parineeti Chopra) आज आपला ३५ वा वाढदिवस साजरा करत आहे. परिणीती चोप्रा सध्या रॉयल वेडिंगमुळे चांगलीच चर्चेत आहे. मागच्या महिन्यात परिणीतीने आपचे खासदार राघव चड्ढासोबत लग्न केले. लग्न झाल्यापासून परिणीतीच्या लग्नातील फोटो आणि व्हिडीओे सतत व्हायरल होत असल्याने ती चर्चेत आहे.

ऐवढंच नाही तर परिणीतीचा बहुप्रतिक्षीत चित्रपट 'मिशन रानीगंज' नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आहे. या चित्रपटातील तिच्या दमदार भूमिकेमुळे देखील ती चर्चेत आहे. बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये नाव घेतल्या जाणाऱ्या परिणीती चोप्राच्या वाढदिवसानिमित्त आज आपण तिच्या आयुष्याशी संबंधित बऱ्याच रंजक गोष्टी जाणून घेणार आहोत...

उच्चशिक्षित आहे परिणीती -

अभिनेत्री परिणीती चोप्राला लहानपणापासूनच अभ्यासाची प्रचंड आवड होती. 22 ऑक्टोबर 1988 रोजी अंबाला येथे जन्मलेली परिणीती चोप्रा शिक्षण पूर्ण करून वयाच्या 17 व्या वर्षी लंडनला गेली. तेथे तिने मँचेस्टर बिझनेस स्कूलमधून बिझनेस, फायनान्स आणि इकॉनॉमिक्समध्ये ट्रिपल ऑनर्स डिग्री मिळवली. त्यानंतर परिणीतीने भारतात परत येण्यापूर्वी काही वर्षे लंडनमध्ये इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून काम केले. पण 2009 मध्ये आलेल्या मंदीमुळे ती भारतात परतली. तिने यशराज बॅनरसोबत काम केले. त्यानंतर दोन हजार रुपये महिन्याला इंटर्नशिपही केली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

एक गायक देखील -

चोप्रा कुटुंबात जन्मलेली परिणीती चोप्रा आज बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. आज तिच्याकडे चित्रपटांची कमतरता नसली तरी एक काळ असा होता जेव्हा तिला हिरोईन होईल असे वाटलेही नव्हते. परीने बँकेत नोकरीही केली आहे. पण तिच्या नशिबामध्ये काहीतरी वेगळंच होतं. लंडनवरून भारतामध्ये आल्यानंतर यशराज बॅनरमध्ये काम करताना परिणीतीने एक दिवस राणी मुखर्जीची पीए म्हणूनही काम केले. राणी मुखर्जीने तिला बॉलिवूडमध्ये काम करण्याचा सल्ला दिला होता. परिणीती एक ट्रेंड शास्त्रीय गायिका देखील आहे. तिने बॉलिवूडमध्येही अनेक गाणीसुद्धा गायली आहेत.

वजन कमी करण्यासाठी १० लाख खर्च -

परिणीती चोप्राच्या फिटनेसबद्दल सांगायचे झाले तर, परिणीती खूप लठ्ठ होती. वजन कमी करण्यासाठी तिने 10 लाख रुपये खर्च केले होते. एकेकाळी परिणीतीचे वजन 86 किलो होते आणि तिने ते 28 किलोने कमी केले आहे. वजन कमी करण्यासाठी परिणीतीने खूपच मेहनत घेतली होती. आपल्या फिटनेसची परिणीती खूपच काळजी घेते.

हा चित्रपट ठरला टर्निंग पॉईंट -

यशराज फिल्म्समध्ये पीआर म्हणून दोन वर्षे काम केल्यानंतर तिने 2011 मध्ये पहिल्यांदा अभिनयात हात आजमावला. या अभिनेत्रीने 'लेडीज वर्सेस रिकी बहल' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट तिच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरला. या चित्रपटातील परिणीतीच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. इथूनच तिने आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. या चित्रपटात परिणीती मुख्य भूमिकेत नसून सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली होती. ज्यासाठी तिला फिल्मफेयर बेस्ट डेब्यू फीमेल अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर तिने 'इशकजादे' चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले.

या चित्रपटात केलं काम -

'शुद्ध देसी रोमान्स', 'हसी तो फसी', 'मेरी प्यारी बिंदू', 'गोलमाल अगेन', 'नमस्ते इंग्लंड', 'किल-दिल', 'केसरी', 'मिशन राणीगंज' यासारख्या चित्रपटांमध्ये परिणीती चोप्राने दमदार भूमिका साकारल्या आहेत. परिणीती चोप्राला अभिनयासोबतच गाण्याची देखील प्रचंड आवड आहे. परिणीतीचा आवाज खूपच मधुर आहे. तिने अनेक चित्रपटांतील गाणी गायली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT