Orhan Awatramani Saam Tv
मनोरंजन बातम्या

Orry Income Source: बाबो! एका लग्नाला जायला ओरी किती पैसे घेतो माहितीये का? आकडा बघून डोळे गरागरा फिरतील

Orry On Primary Source Of Income: बॉलिवूडमधील प्रत्येक सेलिब्रिटींसोबत ओरीचं एक खास नातं आहे. ओरी या सेलिब्रिटींसोबतचे वेगवेगळ्या पोझमधील फोटो नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असतो. अशामध्ये हा ओरी नेमका कोण आहे?, हा ओरी काय करतो?, त्याचा इनकम सोर्स काय आहे? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत.

Priya More

Orhan Awatramani:

बॉलिवूड (Bollywood) सेलिब्रिटींच्या पार्टी असो वा लग्न त्यामध्ये एक व्यक्ती नेहमी दिसते. या व्यक्तीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. सध्या ही व्यक्ती बी टाऊनमध्ये सेलिब्रिटी झाला आहे. ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून ओरी आहे. ओरीशिवाय (Orry) त्यांची पार्टी अपूर्णच असते. बॉलिवूडमधील प्रत्येक सेलिब्रिटींसोबत ओरीचं एक खास नातं आहे. ओरी या सेलिब्रिटींसोबतचे वेगवेगळ्या पोझमधील फोटो नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असतो. अशामध्ये हा ओरी नेमका कोण आहे?, हा ओरी काय करतो?, त्याचा इनकम सोर्स काय आहे? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. अशामध्ये ओरीने एका मुलाखतीमध्ये त्याच्या कमाईचा प्राथमिक स्रोत सांगितला आहे.

ओरीचे नाव ओरहान अवत्रामाणी (Orhan Awatramani) असं आहे. ओरी बॉलिवूडमधील स्टारकिड्ससोबत नेहमीच स्पॉट होत असतो. ओरी त्याच्या ड्रेसिंग स्टाइलमुळे देखील नेहमीच चर्चेत असतो. ओरीने नुकताच त्यांच्या इनकम सोर्सबद्दल सांगितले. एका मुलाखतीमध्ये ऑरीने त्याच्या कमाईच्या प्राथमिक सोर्सचा खुलासा केला आहे. त्याने सांगितले की, 'माझा उद्देश लोकांमध्ये आनंदाचा संदेश पसरवणे आहे. विवाहसोहळ्यांमध्ये हजेरी लावत मी पैसे कमावतो. एका लग्नामध्ये सहभागी होण्यासाठी १५ ते ३० लाख रुपये फी घेतो.'

फोर्ब्सशी बोलताना ओरीने सांगितले की, 'माझा उद्देश लोकांमध्ये आनंदाचा संदेश पसरवणे आहे. यामुळे लोकांच्या संपर्कात राहता येते. यामुळे मला पुढे जाण्यासाठी मदत होते आणि मला त्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची परवानगी मिळते ज्यामुळे इतरांना आणि स्वत:ला आनंद मिळतो. या कार्यक्रमांना जाणे हे माझ्या उत्पन्नाचा प्राथमिक स्रोत आहे. लोकं मला लग्नासाठी बोलावतात आणि ते मला १५ लाख ते ३० लाख रुपये देतात. त्यांना मी पाहुणा म्हणून नाही तर एक मित्र म्हणून उपस्थित राहावे असे वाटते. माझे चाहते माझ्यावर इतके प्रेम करतात की त्यांच्या कार्यक्रमात मी उपस्थित राहावे असे त्यांना वाटते. '

ओरहान अवत्रामणि उर्फ ओरी हे भारतामधील असे एक नाव झाले आहे ज्याच्याबद्दल जाणून घेण्याची प्रत्येकाला इच्छा आहे. ओरीने अंबानी फॅमिलीच्या फंक्शनमध्ये खूप धम्माल केली. रिहानासोबत त्याने डान्स केला. ऐवढंच नाही तर अंबानींची होणारी सून राधिका मर्चंटसोबत देखील तो गरबा खेळला होता. त्याचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले होते. ओरी ही अशी व्यक्ती आहे जी अवघ्या काही तासांमध्ये लाखों रुपये कमावतो. त्याने काही महिन्यांपूर्वीच याचा खुलासा केला होता.

दरम्यान, ओरहान उर्फ ओरी हा एका बड्या उद्योगपतीचा मुलगा आहे. ओरहानला मोठ्या पार्टींमध्ये सहभागी होण्याची आवड आहे. तो नेहमीच नवनवीन ड्रेसिंग स्ट्राईल, हेअर स्टाईलमध्ये पार्टींमध्ये सहभागी होत असतो. ओरीचा सोशल मीडियावर देखील मोठा चाहतावर्ग आहे. ओरहान हा अॅनिमेटर आहे. तसंच टॉप फोर्ड, व्हिजन ऑफ सूपर आणि प्राडा यासारख्या मोठ्या ब्रँडशीही तो जोडला गेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : त्र्यंबकेश्वर मंदिरात परप्रांतीय भाविकांचा राडा, दरवाजावर लाथा मारत गोंधळ घातला

Watch Video : राहुल गांधींचा व्होट चोरीवरुन निवडणूक आयोगावर पुन्हा निशाणा!

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Vivo T4 Pro भारतात लवकरच होणार लाँच, ५०MP कॅमेरा अन् खास फीचर्स, किंमत किती?

Weather Update : पावसाचा जोर वाढला! मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना अलर्ट जाहीर, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT