National Film Awards 2023 Saam Tv
मनोरंजन बातम्या

National Film Awards 2023 मध्ये 'गंगुबाई' आणि 'सरदार उधम सिंग'चा दबदबा, अ‍ॅवॉर्ड घेताना वहीदा रेहमान झाल्या भावुक

Alia Bhatt And Kriti Sanon: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी राष्ट्रपतींनी पुरस्कार विजेत्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.

Priya More

National Film Awards:

69 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा (National Film Awards 2023) आज दिल्लीमध्ये पार पडला. सिनेसृष्टीतील कलाकारांसाठी आजचा दिवस हा खूपच खास आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. जे चित्रपट आणि कलाकारांच्या नावाची या पुरसकारासाठी घोषणा करण्यात आली होती त्यांना आज पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी राष्ट्रपतींनी पुरस्कार विजेत्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी सांगितले की, वहीदा रहमान यांना पुरस्काराने सन्मानित करताना मला खूप आनंद झाला. या पुरस्कार सोहळ्यामध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींची चांगलीच चर्चा झाली. कोण-कोणत्या चित्रपट आणि कलाकारांना पुरस्कार मिळाले हे आज आपण पाहणार आहोत....

- २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'गंगुबाई काठियावाडी' या चित्रपटातील उत्कृष्ट भूमिकेसाठी अभिनेत्री आलिया भट्टला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. आलियाचा हा चित्रपट खूपच सुपरहिट ठरला. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आलिया भट्ट पती रणबीर कपूरसोबत आली होती. यावेळी पांढऱ्या रंगाच्या साडीमध्ये आलिया खूपच सुंदर दिसत होती.

- आलियासोबतच क्रिती सेनॉनला तिच्या 'मिमी' चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. हा चित्रपट २०२१ मध्ये प्रदर्शित झाला होता. यावेळी क्रिती देखील पांढऱ्या रंगाच्या साडीत सुंदर दिसत होती.

- आलियाच्या 'गंगुबाई काठियावाडी' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट संपादन आणि सर्वोत्कृष्ट मेकअप आर्टिस्ट या पुरस्काराने देखील गौरविण्यात आले. या चित्रपटाच्या टीमने यावेळी पुरस्कार घेण्यासाठी हजेरी लावली.

- 'मिमी' चित्रपटातील महत्वाच्या भूमिकेसाठी अभिनेता पंकज त्रिपाठीला देखील सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता या पुरस्काराने गौरवण्यात आले. पंकज त्रिपाठीच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले. यावेळी पंकज त्रिपाठीने हजेरी लावत हा पुरस्कार स्वीकारला.

- 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटातील दमदार अभिनयासाठी मराठमोळी अभिनेत्री पल्लवी जोशीला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री पुरस्काराने गौरवण्यात आले. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आलेली पल्लवी काळ्या रंगाच्या साडीत खूपच सुंदर दिसत होती.

- राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळयामध्ये सर्वात जास्त अवॉर्ड 'सरदार उधम सिंग' या चित्रपटाने मिळवले. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट, सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझायनर, सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझायनर, सर्वोत्कृष्ट छायांकन असे पुरस्कार मिळाले. या चित्रपटामध्ये अभिनेता विकी कौशल मुख्य भूमिकेत आहेत.

- बॉलिवूड चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरच्या 'शेरशाह' चित्रपटाला देखील विशेष ज्युरी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. हा पुरस्कार घेण्यासाठी करण जोहरने हजेरी लावली. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी मुख्य भूमिकेत आहेत.

- बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री वहीदा रेहमान यांना या पुरस्कार सोहळ्यामध्येच दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात आले. पुरस्कार स्वीकारताना वहीदा रेहमान भावुक झाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: सांगलीत जिल्ह्यात कोण जिंकलं? वाचा एका क्लिकवर

Maharashtra Election Result: उल्हासनगरात राष्ट्रवादीला जबर धक्का! भाजपच्या कुमार आयलानींचा मोठा विजय

Sunil Tatkare: खरी राष्ट्रवादी कोणती? अखेर जनतेनं उत्तर दिलचं, सुनिल तटकरेची प्रतिक्रिया

Vidhan Sabha Election Result : अकोल्यात बंडखोरीचा भाजपला फटका; काँग्रेसचे साजिद खान पठाण विजयी

Nanded News : नांदेडमध्ये मतमोजणीदरम्यान दोन गटात तूफान राडा

SCROLL FOR NEXT