Madhuri Dixit Saam Tv
मनोरंजन बातम्या

Madhuri Dixit: खरंच माधुरी दीक्षित लोकसभा निवडणूक लढवणार?, अभिनेत्रीने स्वत:च सांगितलं चर्चांमागचं सत्य

Panchak Movie: चित्रपटसृष्टीनंतर आता माधुरी दीक्षितचे नाव राजकारणाशी जोडले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून माधुरी दीक्षित राजकारणात एन्ट्री करणार असल्याच्या चर्चात सुरू आहेत. पण हे कितपत खरं आहे याबाबत माधुरीनेच सांगितले.

Priya More

Madhuri Dixit On Loksabha Election:

बॉलिवूडची (Bollywood) 'धक धक गर्ल' अर्थात अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आपल्या दमदार अभिनय आणि सौंदर्यामुळे नेहमीच चर्चेत असते. 56 वर्षांची माधुरी आजही सौंदर्याच्या बाबतीत आताच्या नव्या बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देते. चित्रपटसृष्टीनंतर आता माधुरी दीक्षितचे नाव राजकारणाशी जोडले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून माधुरी दीक्षित राजकारणात एन्ट्री करणार असल्याच्या चर्चात सुरू आहेत. पण खरंच माधुरी राजकारणात येणार आहे का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. अशामध्येच माधुरी दीक्षितने या चर्चांवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राजकारणात येण्याच्या चर्चा निराधार असल्याचे मत तिने व्यक्त केले आहे.

माधुरी दीक्षित नुकताच तिचे पती डॉ. श्रीराम नेने यांच्यासोबत झी न्यूज मराठीच्या टॉक शोमध्ये सहभागी झाली होती. या शोमध्येच माधुरी दीक्षितने आपण लोकसभा निवडणूक (Loksabha Election) लढवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. माधुरीने या टॉक शोमध्ये सांगितले की, 'जेव्हा-जेव्हा निवडणुका येतात तेव्हा मला कुठून तरी उमेदवारी दिली जाते. पण निवडणूक लढवणे माझ्या बकेट लिस्टमध्ये समाविष्ट नाही. प्रत्येक निवडणुकीच्या वेळी मला कुठून तरी उभे केले जाते. पण राजकारण हा माझा छंद नाही. 2024 च्या बकेट लिस्टमध्ये 'पंचक' चित्रपटाचा समावेश करण्यात आला आहे. हा चित्रपट यशस्वी झाला तर मला आणखी चित्रपट करण्याची प्रेरणा मिळेल. मला आरोग्य क्षेत्रात काम करायचे आहे.'

माधुरी दीक्षित राजकारणात येण्याच्या चर्चांवर अभिनेत्रीसोबत तिचे पती डॉ. नेने यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. डॉ. नेने यांनी सांगितले की, 'रोल मॉडल समाजाला दिशा देतात. समाजात चांगल्या सुधारणा झाल्या असत्या तर भारताचा विकास झाला असता. आपल्या देशातील जनता खूप हुशार आहे. राजकारणाव्यतिरिक्त प्रत्येक क्षेत्रात यश मिळते. राजकारण हा आमचा पिंड नाही.' अभिनेत्री माधुरी दीक्षित राजकारणात प्रवेश करणार असल्याची अफवा अनेकवेळा पसरली असल्याची माहिती आहे. मात्र यावेळी अभिनेत्रीने समोर येऊन सर्व अफवांना आणि या चर्चांना पूर्णविराम दिले आहे.

दरम्यान, डॉ. श्रीराम नेने आणि माधुरी दीक्षित यांनी निर्मिती केलेला पंचक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कपलने मराठी प्रेक्षकांसाठी ही खास मनोरंजनाची मेजवाणी आणली आहे. 'पंचक' ५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाबाबत प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत. पंचक चित्रपटामध्ये आदिनाथ कोठारे, दिलीप प्रभावळकर, भारती आचरेकर, आनंद इंगळे, तेजश्री प्रधान, सतीश आळेकर, नंदिता पाटकर, सागर तळाशीकर, संपदा कुलकर्णी, आशिष कुलकर्णी, दिप्ती देवी, विद्याधर जोशी, आरती वडगबाळकर आणि गणेश मयेकर हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange : कुणबी प्रमाणपत्र समितीची बैठक, मनोज जरांगेंना निमंत्रण, तोडगा निघणार का?

Maharashtra Live News Update : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी कोकणात भाजपची मोर्चेबांधणी

Success Story: इंजिनियरिंग केलं; एकदा नव्हे तर दोनदा UPSC क्रॅक; २५व्या वर्षी IAS झालेले प्रतिक जैन आहेत तरी कोण?

Thursday Horoscope: गुरुचा आशीर्वाद लाभणार; ५ राशींना होणार धन लाभ, अडचणी होतील दूर; कसा असणार गुरुवारचा दिवस जाणून घ्या

Grahan In Pitru Paksha: पितृ पक्षात चंद्र-सूर्य ग्रहणाचा होणार अद्भुत संयोग; 4 राशींना मिळणार मनाजोग्या गोष्टी

SCROLL FOR NEXT