Akshay Kuamr Fitness Tips Saam Tv
मनोरंजन बातम्या

Mann Ki Baat: फिटनेस 2 मिनिटांची मॅगी किंवा काफी..., अक्षय कुमारने 'मन की बात'मध्ये सांगितला फिटनेस मंत्रा

Akshay Kuamr Fitness Tips: पंतप्रधान मोदींचा (PM Narendra Modi) 'मन की बात'चा हा 108 वा भाग खूपच खास होता. यावेळी त्यांनी नववर्षाच्या शुभेच्छांसोबतच देशातील सर्व नागरिकांना अनेक महत्वाचे संदेशही दिले.

Priya More

Akshay Kumar Participate In Maan Ki Baat:

2023 या वर्षाचा आज शेवटचा दिवस आहे. या वर्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे रविवार 31 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'मन की बात'च्या (Maan Ki Baat) माध्यमातून जनतेशी संवाद साधला. पंतप्रधान मोदींचा (PM Narendra Modi) 'मन की बात'चा हा 108 वा भाग खूपच खास होता. यावेळी त्यांनी नववर्षाच्या शुभेच्छांसोबतच देशातील सर्व नागरिकांना अनेक महत्वाचे संदेशही दिले.

यावेळी देशातील अनेक बड्या व्यक्तिमत्वांनी फिटनेसबाबत अनेक मोठी सिक्रेट्स उघड केली. त्याचसोबत त्यांनी नागरिकांना नवीन वर्षात कसे फिट राहता येईल आणि आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात करण्यासाठी कोणत्या गोष्टींचा अवलंब केला पाहिजे हे सांगितले. या सेलिब्रिटींपैकी एक म्हणजे बॉलिवूडचा 'खिलाडी' अर्थात अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kuamr).

अक्षय कुमारने मोदींच्या 'मन की बात'मध्ये ऑडिओ मेसेजद्वारे देशातील नागरिकांना फिटनेसच्या काही जबरदस्त टीप्स दिल्या. अक्षय कुमारला बॉलिवूडचा 'फिटनेस प्लेयर' म्हटले जाते. त्याने यावेळी आपल्या चाहत्यांना आणि देशवासीयांना फिटनेसचे धडे दिले. यासोबतच त्याने त्याच्या फिटनेसची अनेक रहस्य देखील यावेळी उघड केली. जी ऐकल्यानंतर पीएम मोदी देखील अभिनेत्यावर खूप प्रभावित झाले. 'मन की बात'च्या या वर्षीच्या शेवटच्या एपिसोडमध्ये अक्षय कुमारने बॉडी फिट ठेवण्यासाठी नैसर्गिक मार्ग सांगितले.

अक्षय कुमार फिट ठेवण्यासाठी पोहणे, धावणे आणि व्यायामाला सर्वात जास्त प्राधान्य देतो. अभिनेत्याने देशातील तरुणांना या गोष्टींवर विश्वास ठेवण्यास सांगितले. तो म्हणाला, 'फिट राहायचे असेल तर फिल्म स्टार्सची कॉपी करू नका. फिट राहण्यासाठी नैसर्गिक मार्गांचा अवलंब करा.' अक्षय पुढे म्हणाला, 'आपल्या फिटनेससाठी काय चांगलं आणि काय वाईट हे समजून घेणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे.'

अक्षयने पुढे सांगितले की, 'जर तुम्हाला तुमची लाइफस्टाइल बदलायची असेल तर त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि एखाद्या फिल्मस्टारची बॉडी पाहून स्वत:ला बदलण्याचा प्रयत्न करू नका.' अक्षय कुमार पुढे असं देखील म्हणाला की, 'सर्वप्रथम, तुम्ही जसे दिसत आहात ते आनंदाने स्वीकारा. आजपासून फिल्टरवालं आयुष्य जगू नका, फिटरवालं आयुष्य जगा. फिटनेस 2 मिनिटांची मॅगी किंवा इन्स्टंट कॉफी नाही, जी तुम्हाला एका दिवसात मिळेल.'

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandurbar News : धक्कादायक.. गर्भवती महिलेचा रस्त्यातच गर्भपात; रस्ता नसल्याने बांबुची झोळीतून जीवघेणा प्रवास

महायुतीने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं, एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

Voter ID: दोन मतदार ओळखपत्र आहेत? होऊ शकते जेल; कारण काय? जाणून घ्या

Gold Rate Today : सोनं झालं स्वस्त! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण, पाहा सोन्याचा आजचा भाव

School Holiday: मतदान केंद्र असलेल्या पालिकेच्या शाळांना उद्या सुट्टी, तर शिक्षण आयुक्त म्हणतात उद्या शाळा सुरु राहणार

SCROLL FOR NEXT