Bollywood Celebrity Visit Lalbaugcha Raja Saam Tv
मनोरंजन बातम्या

Lalbaugcha Raja 2023: ‘लालबाग राजा’च्या दर्शनासाठी गेलेल्या बॉलिवूड सेलिब्रिटींचं झालं असं हाल, या अभिनेत्रीला तर दर्शनच मिळालं नाही; VIDEO व्हायरल

लालबाग राजा 2023: मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील बॉलिवूड सेलिब्रिटी गर्दी करत आहेत.

Priya More

Bollywood Celebs at Lalbaugcha Raja:

मुंबईमध्ये सगळीकडे गणेशोत्सवाचा (Ganesh Festival 2023) आनंद पाहायला मिळत आहे. बाप्पाच्या दर्शनासाठी भाविक मोठी गर्दी करत आहेत. बॉलिवूड सेलिब्रिटी (Bollywood Celebrity) देखील वेगवेगळ्या गणेशोत्सव मंडळांना भेट देत बाप्पाचे दर्शन घेत आहेत. मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या (Lalbaugcha Raja) दर्शनासाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील बॉलिवूड सेलिब्रिटी गर्दी करत आहेत.

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविक मोठ्यासंख्येने गर्दी करत असतात. १० ते १२ तास रांगेमध्ये उभं राहून ते दर्शन घेत असतात. अशामध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींना मात्र व्हीआयपी दर्शन मिळते. यावर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. अशामध्येच बॉलिवूडचे काही सेलिब्रिटी बाप्पाच्या दर्शनासाठी गेले असता त्यांची खूपच वाईट अवस्था झाल्याचे चित्र समोर आले आहे. त्यांचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

नुकताच बॉलिवूड अभिनेत्री मानुषी छिल्लर, सोनू सूद, फराह खान, स्मृती इराणी आणि शेखर सुमन हे बाप्पाच्या दर्शनासाठी गेले होते. प्रत्येक सेलिब्रिटी हे व्हीआयपी एन्ट्री घेत बाप्पाचे दर्शन घेत असतात. पण या सेलिब्रिटींना व्हीआयपी दर्शन मिळाले नाही त्यामुळे त्यांना सामान्य भाविकांच्या रांगेमध्ये उभं राहावे लागले. गर्दीमध्ये या सेलिब्रिटींचे चांगलेच हाल झाले. भाविकांच्या गर्दीमध्ये अक्षरश: ते दाबले गेले. बाप्पाच्या दर्शनासाठी त्यांना खूप वेळ रांगेमध्ये तसंच उभं राहावं लागलं. या सेलिब्रिटींचं नेमकं कसं हाल झालं याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

बॉलीवूड अभिनेत्री मानुषी छिल्लर आपल्या आईसोबत लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेली होती. पायामध्ये चप्पल न घालता ती बाप्पाच्या दर्शनासाठी दाखल झाली खरं पण गर्दीमुळे तिला पुढे जाता आले नाही. तिने गर्दीमधून बाप्पाच्या दर्शनासाठी पुढे जाण्याचा खूप प्रयत्न देखील केला. पण गर्दीमुळे तिला दर्शन न घेता तसेच घरी परत जावे लागले.

अभिनेता सोनू सूद आपल्या पत्नीसोबत लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेला होता. अभिनेता शेखर सुमन आईसोबत बाप्पाच्या दर्शनासाठी आला होता. यावेळी फराह खान देखील दर्शनसाठी आली होती. या सेलिब्रिटींचा व्हिडीओ समोर आला आहे. गर्दीने अक्षरश: त्यांना दाबून टाकल्याचे चित्र व्हिडीओत दिसत आहे. कसं बसं त्यांनी बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दीतून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. लालबागच्या राजाच्या दर्शासाठी आले असता त्यांचे जे हाल झाले आहे ते त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत आहे. दरम्यान, यापूर्वी अभिनेता विकी कौशलला देखील गर्दीमुळे लालबागच्या राजाचे दर्शन व्यवस्थित घेता आले नव्हते. त्याचा देखील व्हिडीओ व्हायरल झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wardha News : मनाला चटका लावणारी घटना; शेतावर फवारणीसाठी गेलेल्या तरूण शेतकऱ्याचा मृत्यू

Crime News: घरात चोर शिरल्याचा संशय, नवऱ्यानं उघडला बायकोच्या रुमचा दरवाजा, दृश्य पाहून धक्काच बसला

Maharashtra Live News Update: पीक विम्याचे निकष बदलण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार - मंत्री दत्तात्रय भरणे

Weight Gain : वजन वाढवण्यासाठी गाईचे दूध प्यावे की म्हशीचे दूध?

Dahi handi : एक गाव-एक दहीहंडी! पण फोडण्याची हटके पद्धत, इथे विहिरीत उडी मारून फोडली जाते दहीहंडी; Video

SCROLL FOR NEXT