Kriti Kharbanda And Pulkit Samrat Saam Tv
मनोरंजन बातम्या

भांगेत कुंकू...हातात लाल चुडा, लग्नानंतर क्रिती खरबंदाचा पहिला लूक, डान्स करत सासरी केली एन्ट्री; VIDEO व्हायरल

Kriti Kharbanda And Pulkit Samrat: क्रिती आणि पुलकित यांचे हरियाणातील मानेसर येथील एका लक्झरी रिसॉर्टमध्ये इंटिमेट लग्न झाले. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Priya More

Kriti Kharbanda And Pulkit Samrat Wedding:

बॉलिवूडचे क्यूट कपल क्रिती खरबंदा (kriti kharbanda) आणि पुलकित सम्राट (pulkit samrat) हे शनिवारी लग्नबंधनात अडकले. गेल्या काही दिवसांपासून या कपलच्या लग्नाची चर्चा सुरू होती. अखेर १६ मार्चला दोघांनी कुटुंबीय आणि जवळच्या मित्र परिवाराच्या उपस्थितीमध्ये धुमधडाक्यात लग्न केले.

क्रिती आणि पुलकित यांचे हरियाणातील मानेसर येथील एका लक्झरी रिसॉर्टमध्ये इंटिमेट लग्न झाले. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लग्नानंतर क्रितीने पुलकितसोबत आपल्या सासरी डान्स करत जबरदस्त एन्ट्री घेतली. दोघांचाही डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

लग्नानंतर शनिवारी संध्याकाळी क्रिती खरबंदा आणि पुलकित सम्राट यांनी पहिली झलक दाखवली. क्रिती खरबंदा लग्नानंतर पहिल्यांदाच तिच्या सासरच्या घरी पोहोचली. सासरी तिचे जोरदार स्वागत करण्यात आले. क्रितीचा यावेळीचा लूक खूपच सुंदर होता. सासरच्या घरामध्ये एन्ट्री करताना क्रितीने भांगेमध्ये कुंकू, हातात लाल बांगड्या आणि लाल साडी परिधान करून आपला लूक परिपूर्ण केला होता. यावेळी क्रिती खूपच सुंदर दिसत होती.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, अभिनेत्री क्रिती खरबंदा आणि पुलकित सम्राट त्यांच्या दिल्ली-एनसीआरच्या घरी पोहोचले. तेव्हा त्यांनी पापाराझींना पोज दिल्या नाहीत. पण त्यानंतर त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये ते दोघेही डान्स करताना दिसत आहेत. यावेळी क्रिती खरबंदा भांगेमध्ये कुंकू, नेकलेस, हातावर मेहंदी आणि लाल रंगाचा चुडा घातलेली दिसली. क्रितीने यावेळी लाल रंगाच्या साडीत तिचा नववधूचा लूक फ्लाँट केला आहे. क्रितीच्या चेहऱ्यावरची चमकही यावेळी पाहण्यासारखी होती.

व्हायरल व्हिडिओमध्ये पुलकित सम्राट देखील खूप डॅशिंग दिसत होता. यावेळी अभिनेता पांढऱ्या रंगाच्या कुर्त्यासोबत धोतीमध्ये दिसला. व्हिडिओमध्ये पुलकित सम्राट जबरदस्त डान्स करताना आणि शिट्ट्या वाजवताना दिसला. क्रिती खरबंदा आणि पुलकित सम्राट यांचा लग्नानंतरच्या घरी दोघांचे भव्य स्वागताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. क्रिती खरबंदा आणि पुलकित सम्राट यांनी 15 मार्च रोजी मानेसर येथील ITC ग्रँड लक्झरी रिसॉर्टमध्ये सात फेऱ्या मारल्या. क्रिती आणि पुलकितने त्यांच्या लग्नाचे पहिले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगरात वादग्रस्त स्टेटस अन् मोठा जमाव जमला; नेमकं काय घडलं? VIDEO

Maharashtra Live News Update: - नांदेडमध्ये ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी एक लाख रुपये मदत द्या; संभाजी ब्रिगेडची मागणी

Fact Check : केंद्र सरकारची बेरोजगारी भत्ता योजना! तरुणांना दरमहा २,५०० रुपये मिळणार, काय आहे सत्य?

World Highest Bridge : दोन तासांचा प्रवास ५ मिनिटांत होणार; जगातील सर्वात उंच पूल वाहतुकीसाठी खुला, VIDEO

Dhangar vs Dhangad: धनगर की धनगड नेमकी काय भानगड? विषय थेट पंतप्रधानांच्या दारात|VIDEO

SCROLL FOR NEXT