Tejas Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

कंगना रनौतचा 'Tejas' बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप, चित्रपटाचे तिकीट विकले न गेल्यामुळे शो करावा लागला कॅन्सल

Kangana Ranaut Tejas Movie: तेजस चित्रपटाला फिल्म क्रिटिक्स आणि प्रेक्षकांनी या चित्रपटाला समिश्र प्रतिसाद दिला आहे.

Priya More

Tejas Movie Collection:

बॉलिवूडची (Bollywood) 'कॉन्ट्रव्हर्सी क्वीन' अर्थात अभिनेत्री कंगना रनौतचा (Kangana Ranaut) 'तेजस' चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगली पसंती मिळत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

फिल्म क्रिटिक्स आणि प्रेक्षकांनी या चित्रपटाला समिश्र प्रतिसाद दिला आहे. बॉक्स ऑफिसवर कंगनाच्या तेजसला जादू दाखवता आली नाही. चित्रपटाची कमाई देखील खूपच कमी आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सुपरफ्लॉप ठरला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कंगना रनौतच्या 'तेजस' चित्रपटापासून आशा होती की, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल. पण रिलीज झाल्यानंतर वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. कंगनाने या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी खूप मेहनत घेतली खरी पण तिला यामध्ये काही यश मिळाले नाही. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. कंगना रनौतच्या चित्रपटासाठी थिएटरमध्ये फक्त ५ ते ६ लोकांची गर्दी दिसत असल्याचं बोललं जातंय.

तेजस चित्रपट पाहायला येणाऱ्या प्रेक्षकांची संख्या कमी असल्यामुळे चित्रपटगृहाच्या मालकांनी हा चित्रपट काढून टाकण्याची तयारी सुरू केली आहे. जर हे चित्र असेच राहिले तर 'तेजस' चित्रपटगृहात दुसरा वीकेंड पाहू शकणार नाही. गेटी गॅलेक्सी चित्रपटगृहाच्या मालकाने बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, 'रविवारी फक्त १०० प्रेक्षकच हा चित्रपट पाहण्यासाठी आले होते. तर इतर दिवशी फक्त १० ते १२ प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी येत आहेत. अशामध्ये विक्रांत मेसीच्या '१२ वी फेल' चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहेत. हा चित्रपट चांगली कमाई करत आहे.'

तर आणखी एका चित्रपटगृहाच्या मालकाने सांगितले की, 'या वर्षी पहिल्यांदाच मॉर्निंगचा शो कॅन्सल करावा लागला. कारण या शोचे एकही तिकीट विकले गेले नाही. बाकी शोमध्ये २० ते ३० प्रेक्षकांनीच हजेरी लावली होती.' तेजस चित्रपटाला प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या खराब प्रतिसादामुळे कंगना रनौतची चिंता वाढली आहे. कारण याआधीचे तिचे चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले होते. कंगनाचे 'चंद्रमुखी २', 'धाकड', 'थलाइवी', 'पंगा' आणि 'जजमेंटल' हे चित्रपट फ्लॉप ठरले होते.

sacnilk च्या अहवालानुसार, 'तेजस'ने पहिल्या सोमवारी फक्त ४० लाखांची कमाई केली होती. तर पाचव्या दिवशी चित्रपटाने फक्त ३५ लाखांची कमाई केली होती. ४० कोटींहून अधिक बजेट असलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत फक्त ४.५० कोटींची कमाई केली आहे. जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, ६ दिवसांत या चित्रपटाने फक्त ६ कोटी रुपयांपेक्षा कमी कमाई केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

४०-५० विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल बस थेट २०० फूट खोल दरीत कोसळली, विद्यार्थी बसमध्ये अडकले, VIDEO

Maharashtra Live News Update : पुण्यात इमारतीच्या सहाव्या मजल्यावर भीषण आग

Chanakya Niti: या ५ ठिकाणी माणसाने कधीच पाऊल ठेवू नये, नाहीतर इज्जतीला लागेल कलंक

Horrific Accident : भीषण अपघातात भाजप नेत्यासह दोघांचा मृत्यू; राजकीय वर्तुळात शोककळा

धक्कादायक! रेड लाइट एरियात १२ वर्षीय मुलीला विकण्याचा प्रयत्न, आरोपीला स्थानिकांनी पकडून चोपलं

SCROLL FOR NEXT