Malvika Raaj Engagement Saam Tv
मनोरंजन बातम्या

Malvika Raaj Engagement: 'कभी खुशी कभी गम'मधील छोट्या करीनाचा साखरपुडा, सेलिब्रिटींनी लावली हजेरी

Malvika Raaj Engagement With Pranav Bagga: मालविकाच्या साखरपुड्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या साखरपुड्याला बॉलिवूड (Bollywood) सेलिब्रिटींसह टीव्हीच्या सेलिब्रिटींनी देखील हजेरी लावली होती.

Priya More

Malvika Raaj Engagement Photo:

'कभी खुशी कभी गम' (kabhi khushi kabhie gham) या चित्रपटातील छोट्या करीनाची भूमिका साकारणारी आणि 'माता की चौकी' या मालिकेच्या माध्यमातून घराघरामध्ये पोहचलेली अभिनेत्री मालविका राजचा (Malvika Raaj) साखरपुडा झाला. मालविकाला काही दिवसांपूर्वी तिचा बिझनेसमन बॉयफ्रेंड प्रणव बग्गने प्रपोज केला होता.

त्यानंतर आता दोघांचा साखरपुडा पार पडला. मालविकाच्या साखरपुड्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या साखरपुड्याला बॉलिवूड (Bollywood) सेलिब्रिटींसह टीव्हीच्या सेलिब्रिटींनी देखील हजेरी लावली होती. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

23 नोव्हेंबरला म्हणजे गुरूवारी मालविका राजने मुंबईत प्रणव बग्गासोबत साखरपुडा केला. ज्याचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. या कपलच्या साखरपुड्याला बॉलिवूडचे बडे सेलिब्रिटी उपस्थित होते. मालविका लवकरच प्रणवसोबत लग्न करणार आहे. साखरपुड्यामध्ये हे कपल खूपच क्युट दिसत होते. त्याचसोबत दोघांनी एकत्र जबरदस्त पोझ देत फोटोसेशन केले.

मालविकाने साखरपुड्यामध्ये नेव्ही ब्ल्यू कलरचा लेहेंगा नेकलाइन ब्लाउजसह परिधान केला होता. मालविकाने लेहेंगा रंगीत दुपट्ट्यासह तिचा रॉयल लुक पूर्ण केला. अभिनेत्रीने लेयर्ड स्टेटमेंट नेकलेस, स्टड इअररिंग्स आणि रिंग्ससह आपला लूक पूर्ण केला होता. वधूच्या रुपात मालविका खूपच सुंदर आणि ग्लॅमरस दिसत होती. तर प्रणव बग्गाने लाल रंगाचा कुर्ता आणि जॅकेट परिधान केला होता. यामध्ये तो खूपच हँडसम दिसत होता.

मालविका आणि प्रणवच्या साखरपुड्याला बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ आणि त्यांची पत्नी आयेशा श्रॉफने हजेरी लावली. अभिनेत्री भाग्यश्रीने मुलगा अभिमन्यू दासानीसोबत मालकिच्या साखरपुड्याला उपस्थिती लावली. अभिनेत्री रवीना टंडन हिरव्या आणि निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती. याशिवाय मालविका राजची मैत्रिण बरखा हिनेही तिच्या खास दिवशी हजेरी लावली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Bangladesh Tour: टीम इंडियाचा बांगलादेश दौरा का झाला रद्द? काय आहे कारण,जाणून घ्या

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT