Shah Rukh Khan Stunt Video Saam tv
मनोरंजन बातम्या

Shah Rukh Khan Stunt Video: 'जवान'मधील किंग खानचा खतरनाक स्टंट, शूटिंगचा VIDEO होतोय व्हायरल

Shah Rukh Khan Jawan Movie: जवान चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान खतरनाक स्टंट करतानाचा शाहरुख खानचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Priya More

Jawan Movie Collection:

बॉलवूड (Bollywood) अभिनेता शाहरुख खानने (Shah Rukh Khan) पुन्हा एकदा सिद्ध करुन दाखवले की त्याला उगाच बॉलिवूडचा 'किंग खान' म्हटलं जात नाही. शाहरुखचा नुकताच प्रदर्शित झालेल्या 'जवान' चित्रपटाची (Jawan Movie) सध्या बॉक्स ऑफिसवर (Box Office) हवा आहे. हा चित्रपट दिवसेंदिवस रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे.

शाहरुखच्या या चित्रपटातील डायलॉग आणि अ‍ॅक्शन सीन्सने थिएटरमध्ये प्रेक्षक टाळ्या आणि शिट्या वाजवत आहेत. या चित्रपटातील शाहरुखच्या अभिनयाचे सर्वजण कौतुक करत आहेत. अशामध्ये जवान चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान खतरनाक स्टंट करतानाचा शाहरुख खानचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

५७ वर्षांचा शाहरूख खान त्याच्या प्रत्येक चित्रपटामध्ये जास्तीत जास्त अॅक्शन सीन्स देत असतो. एटलीच्या जवान चित्रपटामध्ये देखील शाहरुख खानने हाई-ऑक्टेन एक्शन सीनचे शूटिंग केले आहे. ज्याचा बीटीएस व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून शाहरुखचे चाहते त्याच्या डेडिकेशनचे खूपच कौतुक करत आहेत.

शाहरुख खानच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, हा व्हिडिओ 'जवान'च्या सेटवरील आहे. यामध्ये शाहरुख खान केबलच्या मदतीने ट्रकवर उडी मारताना दिसत आहे. तो या चित्रपटातील अ‍ॅक्शन सीन शूट करत आहे. हा व्हिडिओ चित्रपटाचे अ‍ॅक्शन-दिग्दर्शक फ्रेडी फिशरने शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून चाहते त्याचे कौतुक करत आहेत. एका चाहत्याने लिहिले आहे की, 'या वयामध्ये असे हाई-ऑक्टेन एक्शन करत आहे. त्याच्या शरीरावर अनेक जखमा झाल्या आहेत.'

जवान चित्रपट ७ सप्टेंबर २०२३ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने अवघ्या ५ दिसांमध्ये २८७ पेक्षा जास्त कमाई केली आहे. या चित्रपटामध्ये शाहरुख सोबत विजय आणि नयनतारा हे मुख्य भूमिकेत आहेत. दरम्यान, पठाण आणि जवानच्या यशानंतर आता शाहरुख खानच्या चाहत्यांना त्याच्या पुढच्या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. शाहरुख खान लवकरच राजकुमार हिरानी यांच्या डंकी चित्रपटामध्ये दिसणार आहे. हा चित्रपट डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : धक्कादायक! ४५ वर्षांच्या व्यक्तीने केलं ६ वर्षीय मुलीशी लग्न, कुठे घडली घटना?

Relationship vs Friendship : रिलेशनशिप की फ्रेंडशिप कशात असतो जास्त फायदा?

Shocking: प्रसिद्ध इन्फ्लुएंसर अडकली होती वेश्याव्यवसायात; ६ वर्षानंतर अशी झाली सुटका; भयंकर अनुभव सांगताना म्हणाली...

Chhangur Baba : यूपीतील धर्मांतर करणाऱ्या छांगुर बाबाचे पुणे कनेक्शन; कोट्यवधींची मालमत्ता खरेदी करण्याची होती तयारी

Sawan 2025 Upay: उत्तरेतील श्रावणाचा आज पहिला दिवस; 'हे' उपाय करा भगवान शंकर होतील प्रसन्न

SCROLL FOR NEXT