बॉलिवूडचा (Bollywood) 'किंग खान' (King Khan) आणि साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा (Actress Nayantara) स्टारर 'जवान' चित्रपटाला (Jawan Movie) प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई करण्यास सुरुवात केली.
चित्रपटाच्या कमाईचा आकडा थांबायचा नाव घेत नाही. पहिल्या चार दिवसांमध्येच या चित्रपटाने २८७ कोटींचा गल्ला जमवला. पण पाचव्या दिवशी मात्र बॉक्स ऑफिसवर जवानचा वेग मंदावला. पाचव्या दिवशी चित्रपटाने कमी कमाई केली असली तरी देखील बॉक्स ऑफिसवर जवानने ४ रेकॉर्ड मोडले आहेत. या चित्रपटाने आतापर्यंत ३०० कोटींपेक्षा जास्त गल्ला जमवला आहे.
बॉक्स ऑफिस इंडियाच्या रिपोर्टनुसार, शाहरुख खानच्या जवान चित्रपटाच्या कमाईवर पाचव्या दिवशी वीक डेज आणि इंडिया-पाकिस्तान मॅचचा परिणाम झाल्याचे दिसून आले.याच कारणामुळे चित्रपटाची कमी कमाई झाली. या चित्रपटाने पाचव्या दिवशी बॉक्स ऑफिसवर ३० कोटींची कमाई केली. या चित्रपटाने आतापर्यंत एकूण ३१६.१६ कोटींची कमाई केली आहे. इतकी मोठी कमाई करत जवानने ४ रेकॉर्ड मोडले आहे.
जवान बॉलिवूडचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ६५.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. 'जवान'ने पहिल्या तीन दिवसांत १८०.४५ कोटी रुपये कमावले आणि हा सर्वाधिक कमाई करणारा बॉलिवूड चित्रपट ठरला. यापूर्वी हा विक्रम शाहरुख खानच्या 'पठाण'च्या नावावर होता. 'पठाण'ने पहिल्या तीन दिवसांत १६६.५ कोटी रुपयांची कमाई केली होती. 'जवान' हा दक्षिणेत तीन दिवसांत सर्वाधिक कमाई करणारा पहिला बॉलिवूड चित्रपट ठरला आहे. तर, 'जवान' चित्रपटाने जगभरातील कलेक्शनमध्ये सर्वाधिक कमाई केली आहे. तीन दिवसांत ३१३ कोटी जमा झाले आहेत.
- पहिल्या दिवशी - ७५ कोटी रुपयांची कमाई.
- दुसऱ्या दिवशी - ५३.२३ कोटी रुपयांची कमाई.
- तिसऱ्या दिवशी - ७७.८३ कोटी रुपयांची कमाई.
- चौथ्या दिवशी - ८०.१ कोटी रुपयांची कमाई.
- पाचव्या दिवशी - ३० कोटी रुपयांची कमाई.
- जवानचे आतापर्यंचे एकूण कलेक्शन - ३१६.१६ कोटी रुपये.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.