Aamir Khan-Kiran Rao And Azad Khan Sing Song Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ira-Nupur Sangeet: ... एक हजारों में मेरी बहना है, आझाद खानने लाडकी बहीण आयरासाठी गायलं गाणं; VIDEO व्हायरल

Aamir Khan-Kiran Rao And Azad Khan Sing Song Video: 9 जानेवारीला आयरा आणि नुपूरची संगीत सिरेमनी झाली. ज्यामध्ये आयरा आणि नुपूरने फॅमिलीसोबत खूप एन्जॉय केले. याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Priya More

Ira Khan And Nupur Shikhare Wedding:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता आमिर खानची (Aamir Khan) लाडकी मुलगी आयरा तिच्या नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे. आयरा आणि नुपूर शिखरे आज विवाहबंधनात (Ira Khan And Nupur Shikhare Wedding) अडकणार आहे. दोघांच्याही कुटुंबातील सदस्य आणि मित्र परिवारांच्या उपस्थितीमध्ये आयरा आणि नुपूर आज लग्न करणार आहेत. आयरा आणि नुपूरच्या लग्नाचे फंक्शन उदयपूरमध्ये सुरू आहे.

9 जानेवारीला आयरा आणि नुपूरची संगीत सिरेमनी झाली. ज्यामध्ये आयरा आणि नुपूरने फॅमिलीसोबत खूप एन्जॉय केले. याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावेळी आमिर खान, किरण राव आणि त्यांचा मुलगा आझाद हे या संगीत सिरेमनीमध्ये सर्वात जास्त चर्चेत राहिले. या तिघांनीही आयरासाठी खास परफॉर्मन्स दिला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आमिर खानने आपल्या मुलीला संगीत सिरेमनीमध्ये असं गिफ्ट दिलं आहे जे ती कधीच विसरू शकणार नाही. कदाचित याचसाठी आमिर खान गेल्या काही दिवसांपासून क्लासिकल म्युजिकची प्रॅक्टिस करत होता. आयराच्या संगीत सिरेमनीमध्ये आमिर खानने लाडक्या मुलीसाठी जबरदस्त परफॉर्मन्स दिला. ज्याची सध्या सगळीकडेच चर्चा होत आहे. आयराच्या संगीत सिरेमनीमध्ये आमिर खानसोबत त्याची एक्स वाइफ किरण राव आणि मुलगा आजाद यांनी एकत्रित हिंदी गाणी गायली. यावेळी हे तिघेही ट्रेडिशनल लूकमध्ये दिसून आले.

आयरा आणि नुपूरच्या संगीत सिरेमनीमध्ये आमिर खान,किरण राव आणि आजादने 'चलके तुझे मैं लेकर चलूं, ऐसे गगन के तले...' आणि 'प्यार का नगमा है...' यासारखी गाणी गायली. तर आजादने आपल्या लाडक्या बहिणीसाठी 'फुलोका तारो का सबका कहना है एक हजारों में मेरी बहना', हे गाणं गायलं. त्याचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. आजादचा परफॉर्मन्स पाहून आयरा भावुक झाली. याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याला नेटिझन्सनी चांगली पसंती दिली आहे.

संगीत सिरेमनीसाठी आयरा आणि नुपूरने खूपच सुंदर ड्रेसिंग केली होती. दोघांनी जबरदस्त अंदाजमध्ये एन्ट्री घेतली. त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, आयरा-नुपूरच्या एन्ट्री वेळी 'आफरीन-आफरीन' हे गाणं वाजत आहे. आयराने यावेळी लेहेंगा परिधान केला होता. तर नुपूरने फॉर्मल सूट परिधान केला होता. यावेळी हे कपल खूपच क्युट दिसत होते. आयरा आणि नुपूरने ३ जानेवारीला मुंबईमध्ये कोर्ट मॅरेज केले. त्यानंतर आता उदयपूरमध्ये या कपलचे मराठमोळ्या पद्धतीने लग्न होणार आहे. यानंतर मुंबईत ग्रॅण्ड रिसेप्शनही होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hidden Gems Maharashtra : भंडारदऱ्याजवळ पाहा Top 7 ठिकाणं, पावसाळ्यातलंं अद्भूत दृश्य

Maharashtra Live News Update : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसेची बैठक

'आयत्या बिळात नागोबा' या म्हणीचा अर्थ काय?

Maharashtra Politics: महाराष्ट्र राज्य सहकारी संघावर भाजपचं वर्चस्व, प्रवीण दरेकरांकडे एकहाती सत्ता

Akot News : पुराचा वेढा; संपर्क तुटला; अमिनापूरमधील शेकडो ग्रामस्थ अडकले

SCROLL FOR NEXT