Hrithik Roshan Birthday: लहानपणापासूनच 'या' या आजाराने त्रस्त होता हृतिक रोशन, अभिनेत्याचं खरं आडनाव माहितीये?

Hrithik Roshan Movie: आपल्या फिटनेस आणि डान्स स्टाइलसाठी प्रसिद्ध असलेल्या हृतिकचा जगातील देखण्या अभिनेत्यांच्या टॉप 10 यादीत समावेश आहे. हृतिकचा चाहता वर्ग खूपच मोठा आहे.
hrithik roshan
hrithik roshan saam tv
Published On

Hrithik Roshan Bday Special:

बॉलिवूडचा (Bollywood) 'ग्रीक गॉड' म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आज आपला ५० वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेता-दिग्दर्शक राकेश रोशन यांचा मुलगा असलेल्या हृतिकने 2000 साली प्रदर्शित झालेल्या 'कहो ना प्यार है' या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. याच चित्रपटाने हृतिकच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.

त्याचा पहिलाच चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटाने त्याला रातोरात स्टार बनवले. या चित्रपटानंतर हृतिक रोशनची क्रेझ इतकी वाढली की 24 वर्षांनंतरही तो 'एव्हरग्रीन क्रश' आहे. आपल्या फिटनेस आणि डान्स स्टाइलसाठी प्रसिद्ध असलेल्या हृतिकचा जगातील देखण्या अभिनेत्यांच्या टॉप 10 यादीत समावेश आहे. हृतिकच्या वाढदिवसानिमित्त (Hrithik Roshan Birthday) आपण त्याच्या फिल्मी करिअरसोबत पर्सनल लाइफशीसंबंधित न माहिती असलेल्या गोष्टी जाणून घेणार आहोत...

लहनापणापासूनच व्हायचे होते अभिनेता -

लाखो तरुणाईंच्या हृदयांवर राज्य करणाऱ्या हृतिक रोशनबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे की, त्याला लहानपणी एक आजार झाला होता. ज्यामुळे त्याला त्याच्या वडिलांकडून ओरडा मिळत होता. हृतिक रोशनला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. त्याला नेहमीच अभिनेता बनायचे होते. परंतु आजारपणामुळे त्याला आपले स्वप्न पूर्ण करण्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. पण तरी देखील यावर मात करत तो बॉलिवूडचा सुपरस्टार बनण्यात यशस्वी झाला.

६ व्या वर्षांपासून होता हा आजार -

हृतिक लहानपणापासूनच अडखळत बोलायचा. त्याला स्पष्ट बोलता येत नव्हतं. 2009 मध्ये फराह खानच्या शो 'तेरे मेरे बीच में' मध्ये खुद्द अभिनेत्याने याचा खुलासा केला होता. वयाच्या ६ व्या वर्षांपासून हा आजार असल्याचे त्याने या शोमध्ये सांगितले होते. यामुळे तो शाळेत जाण्यास टाळाटाळ करत असे. कारण मुले त्याच्या आजाराची चेष्टा करत असत आणि त्याला चिडवत होते.

hrithik roshan
Kirtan Programme : वसा संस्कृतीचा-वारसा किर्तनाचा; संतांचे विचार पोहचवणार घरात-घरात

अभिनय कारकिर्दीवर परिणाम -

हा आजार वयाच्या 35 व्या वर्षापर्यंत आपल्यासोबत होता असे देखील हृतिकने सांगितले होते. अशा परिस्थितीत चित्रपटांच्या स्क्रिप्ट नीट वाचता न आल्याने याचा त्याच्या अभिनय कारकिर्दीवर परिणाम होत होता. मात्र, नंतर हृतिकने त्याच्या समस्येवर उपाय शोधला आणि स्पीच थेरपी घेण्यास सुरुवात केली. आता तो व्यवस्थित बोलतो.

hrithik roshan
Ram Mandir Inauguration: राम नामाचा अर्थ जगला..., आदर्श शिंदेच्या आवाजातील 'प्रभू श्रीराम' गाणं भेटीला

हृतिकचं खरं आडनाव -

हृतिकला सर्वजण 'हृतिक रोशन' या नावाने ओळखतात. पण तुम्हाला माहित आहे का की हे अभिनेत्याचे खरे आडनाव नाही. हृतिकचे खरे आडनाव 'रोशन' नसून 'नागरथ' आहे हे फार कमी लोकांना माहिती आहे. अभिनेत्याचे पूर्ण नाव ऋतिक राकेश नागरथ आहे. 'रोशन' हे हृतिकच्या आजीचे आडनाव होते. जे नंतर राकेशने त्याच्या नावात जोडले आणि आता हृतिक देखील आपल्या नावापुढे रोशनच लावतो.

hrithik roshan
Ira-Nupur Sangeet: ... एक हजारों में मेरी बहना है, आझाद खानने लाडकी बहीण आयरासाठी गायलं गाणं; VIDEO व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com