बॉलिवूडचे (Bollywood) सुप्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांचा सुपरहिट चित्रपट 'गंगूबाई काठियावाडी'च्या (Gangubai Kathiawadi Movie) माध्यमातून प्रसिद्धी मिळालेला अभिनेता शांतनु माहेश्वरी सध्या चर्चेत आला आहे. शांतनु माहेश्वरी फसवणुकीचा शिकार झाला आहे. शांतनु माहेश्वरीचे बँक अकाऊंट हॅक करण्यात आले आहे. नुकताच अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट टाकत ही धक्कादायक घटना शेअर केली आहे.
शांतनुने फसवणुकीच्या घटनेची संपूर्ण माहिती त्याच्या लाखो चाहत्यांसोबत शेअर केली आहे. याशिवाय या प्रकारापासून सर्वांनी सावध राहण्याचे आवाहनही त्याने केले आहे. त्याच्या पोस्टमध्ये शंतनूने आपल्या नकळत त्याच्या बँक अकाऊंवर कार्ड बनवल्याचा खुलासा केला. हे प्रकरण आणखी गंभीर तेव्हा झाले जेव्हा त्याचा नोंदणीकृत ईमेल आयडी, फोन नंबर आणि पत्ता देखील त्याच्या नकळत बदलण्यात आला.
शांतनुने सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, 'माझे अॅक्सिस बँक अकाऊंटची फसवणूक झाली यावर माझा विश्वास बसत नाहीये. माझ्या माहितीशिवाय कार्ड बनवले गेले आणि मला कोणताही OTP मिळाला नाही आणि माझा नोंदणीकृत ईमेल आयडी आणि फोन नंबर कोणत्याही पडताळणीशिवाय बदलण्यात आला.' पोस्टमध्ये या प्रकरणावर तातडीने कारवाई केल्याबद्दल त्याने संबंधित लोकांचे आभारही मानले आहेत. त्याने या पोस्टमध्ये अॅक्सिस बँक, सायबर पोलिस आणि मुंबई पोलिसांना देखील टॅग करत मदतीचे आवाहन केले.
शांतनु माहेश्वरी हा मनोरंजन क्षेत्रातील एक प्रसिद्ध चेहरा आहे. फिक्शन शो, रिॲलिटी शो, वेब शो, म्युझिक व्हिडिओ आणि चित्रपटांच्या माध्यमातून त्याने प्रेक्षकांच्या मनामध्ये स्थान निर्माण केले आहे. शांतनुसोबत घडलेली ही घटना धक्कादायक आहे. सामान्यांप्रमाणे सेलिब्रिटी देखील सायबर क्राइमचे बळी ठरत आहे. शांतनुआधी अनेक सेलिब्रिटींसोबत देखील अशाप्रकारच्या घटना घडल्या आहेत.
दरम्यान, शांतनुच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, त्याने 2017 मध्ये मोठ्या पडद्यावर पाऊल ठेवले. 'समथिंग लव्ह लाईक' हा त्याचा पहिला चित्रपट आहे. यानंतर तो 2020 मध्ये 'स्पेशल डे' या चित्रपटात दिसला. 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटातून त्याला खरी ओळख मिळाली. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या चित्रपटात तो अफसान रज्जाकच्या भूमिकेत दिसला होता. तो लवकरच अजय देवगणच्या 'औरों में कहां दम था' या चित्रपटात दिसणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.