FWICE Calls Filmmakers To Boycott Maldives Saam Tv
मनोरंजन बातम्या

Maldives VS Lakshadweep: सेलिब्रिटीनंतर आता मालदीववर FWICE ची नाराजी, निर्मात्यांना चित्रपटाचे शूटिंग थांबवण्याचे केले आवाहन

FWICE Calls Filmmakers To Boycott Maldives: सेलिब्रिटींनंतर आता फिल्म इंडस्ट्री युनियन फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज म्हणजेच एफडब्लयूआयसीईनेही (FWICE) मालदीववर राग व्यक्त करत मोठा निर्णय घेतला आहे.

Priya More

Boycott Maldives:

गेल्या काही दिवासांपासून मालदीव विरुद्ध लक्षद्वीप असा वाद सुरू आहे. अशा परिस्थितीत बॉलिवूडपासून ते क्रीडा जगतापर्यंतच्या अनेक स्टार्सनी मालदीववर बहिष्कार टाकला. भारतातील पर्यटन आणि बेटांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी एकत्र आले आहेत. अक्षय कुमार, सलमान खान, अमिताभ बच्चन, कंगना रनौत, रणदीप हुड्डा आणि श्रद्धा कपूर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट करत मालदीवला सडेतोड उत्तर दिलं होतं. सेलिब्रिटींनंतर आता फिल्म इंडस्ट्री युनियन फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज म्हणजेच एफडब्लयूआयसीईनेही (FWICE) मालदीववर राग व्यक्त करत मोठा निर्णय घेतला आहे.

इंडस्ट्री युनियन फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजने एक मोठा निर्णय घेतला असून यापुढे मालदीवमध्ये बॉलिवूडचे कोणतेही चित्रपट किंवा गाणी चित्रित होणार नाहीत. FWICE ने चित्रपटाच्या निर्मात्यांना शूटिंग थांबवण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनंतर आता FWICE ने चित्रपट निर्मात्यांना मालदीववर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. FWICE ने या संदर्भात एक भली मोठी प्रेस नोट शेअर केली आहे. त्यांची ही प्रेसनोट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

FWICE ने या प्रेस नोटमध्ये असे लिहिले आहे की, 'मालदीवच्या तीन मंत्र्यांच्या अवमानकारक विधानावरून भारत आणि मालदीव यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मीडिया आणि मनोरंजन उद्योगात काम करणारे बहुतेक कामगार, तंत्रज्ञ आणि कलाकार यांची सर्वात जुनी आणि सर्वात मोठी संस्था FWICE जागतिक स्तरावर आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल मालदीवच्या मंत्र्यांच्या अत्यंत बेजबाबदार आणि चुकीच्या विधानांचा निषेध करते.'

FWICE ने या प्रेसनोटमध्ये पुढे असे लिहिले आहे की, 'राष्ट्र आणि त्याच्या व्यापक संस्कृतीशी एकता दाखवत FWICE ने मालदीव आणि त्याच्या शूटिंग लोकेशन्सवर पूर्णपणे बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी, FWICE आपल्या सदस्यांना भारतातील अशाच ठिकाणी शूटिंग करण्याचे आणि भारतातील पर्यटनाच्या विकासात योगदान देण्याचे आवाहन करते.'

दरम्यान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी लक्षद्वीपच्या एका छोट्या बेटावर गेले. लक्षद्वीप हे भारताचा एक सुंदर आणि आश्चर्यकारक भाग आहे. पीएम मोदींनी लक्षद्वीप भेटीनंतर फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियवर शेअर केले होते. त्यानंतर मालदीवच्या मंत्र्यांनी लक्षद्वीप आणि पंतप्रधान मोदींविरोधात अशोभनीय टिप्पणी केल्यानंतर हा संपूर्ण वाद निर्माण झाला. यानंतर संपूर्ण बॉलिवूड आणि संपूर्ण देश मालदीवच्या विरोधात उभा ठाकला आहे. प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मालदीववर बहिष्कार टाकला जाऊ लागला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election : अबब! राज्यात पैशांचा महापूर, आचारसंहितामध्ये आतापर्यंत ५३६ कोटींची मालमत्ता जप्त!

Marathi Actress: फोटोतील या चिमुकलीला ओळखलंत का? आहे मराठी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री

Shadashtak Yog 2024: शुक्र-मंगळाच्या युतीने बनला षडाष्टक राजयोग; 'या' राशी होणार श्रीमंत, करियरमध्येही होणार प्रगती

Success Story: परदेशात शिक्षण,Microsoft ची लाखोंच्या पगाराची नोकरी सोडली, ४० व्या वर्षी उभारली १२००० कोटींची कंपनी

Central Railway: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! मतदारांसाठी विशेष लोकल धावणार, वेळ काय? जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT