Hrithik Roshan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Hrithik Roshan: हृतिक रोशनला नेमकं झालंय काय?, फोटो पाहून चाहते आले चिंतेत

Hrithik Roshan Injured: हृतिक रोशन पुन्हा चर्चेत आला आहे. यामागचे कारण म्हणजे हृतिक रोशनचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे जो पाहून त्याचे चाहते चिंतेत आले आहेत.

Priya More

Hrithik Roshan Photo:

बॉलिवूडचा (Bollywood) सुपरस्टार हृतिक रोशनचा 'फाइटर' चित्रपट (Fighter Movie) नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्याच्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. २५ जानेवारीला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील हृतिक रोशनची (Hrithik Roshan) एरियल ॲक्शन प्रेक्षकांना प्रचंड आवडली. त्याचसोबत हृतिक रोशनच्या अभिनयाचे देखील खूप कौतुक होत आहे.

अशामध्ये हृतिक रोशन पुन्हा चर्चेत आला आहे. यामागचे कारण म्हणजे हृतिक रोशनचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे जो पाहून त्याचे चाहते चिंतेत आले आहेत. हृतिक रोशन क्रॅचच्या मदतीने उभा राहिलेला दिसत आहे. त्याला काही तरी दुखापत झाल्याचे दिसत आहे. त्याचा हा फोटो पाहून सर्वांना एकच प्रश्न पडला आहे अभिनेत्याला नेमकं काय झालं आहे.

हृतिक रोशनने नुकताच आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून त्याचा एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये हृतिक रोशन क्रॅचच्या मदतीने उभा राहिल्याचे दिसत आहे आणि त्याच्या कमरेला बेल्ट बांधला आहे. हृतिक रोशनने आपल्या मोबाईलमध्येच हा फोटो काढला आहे.

हृतिकने हा फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'शुभ दुपार, तुमच्यापैकी किती जणांना क्रॅच किंवा व्हीलचेअरची मदत घ्यावी लागली आहे? क्रॅच किंवा व्हीलचेअरवर असताना तुम्हाला कसे वाटले? मला आठवते माझ्या आजोबांनी व्हीलचेअरवर बसण्यास नकार दिला कारण ते त्यांच्या स्ट्रॉन्ग इमेजच्या अनुरूप नव्हते. मला आठवतंय मी त्यांना म्हटलं होतं, डेडा तू फक्त जखमी झाला आहे. तुझ्या वयाशी त्याचा काही संबंध नाही! यामुळे तुझी दुखापत बरी होण्यास मदत होईल पण ते सहमत झाले नाही. मला खूप वाईट वाटले कारण त्यांनी आपली भीती लपवण्यासाठी हे केले आणि त्यांच्या वेदना वाढल्या.'

हृतिक रोशनने त्याच्या पोस्टमध्ये पुढे सांगितले की, 'मंगळवारी माझ्या स्नायूवर ताण आला.' यासोबतच हृतिक रोशनच्या या पोस्टचा उद्देश असा होता की गरज पडल्यास क्रॅच किंवा व्हीलचेअरची मदत घेतल्याने स्ट्रॉग इमेजवर काही फरक पडत नाही. सध्या हृतिक रोशनच्या या पोस्टवर चाहते त्याच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. त्यांनी हृतिकला काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्व स्टार्सनी हृतिक रोशनच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सुवर्णनगरीत सोन्याने उच्चांक गाठला; दसऱ्याआधी १०५० रुपयांची वाढ; वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: अकोला जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 29,327 हेक्टर क्षेत्रावर नुकसान

Hug Benefits : पार्टनरला जादूची झप्पी मारा अन् रिलॅक्स व्हा... वाचा फायदे

Palghar : खड्ड्यामुळे बस सेवा बंद; शालेय विद्यार्थ्यांना करावी लागतेय पायपीट

Tandalachi kheer: दसऱ्याला बनवा काहीतरी गोडधोड,तांदळाची खीर बनवण्याची सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT