Ranbir Kapoor  Saam TV
मनोरंजन बातम्या

Ranbir Kapoor: रणबीर कपूरला ईडीचे समन्स, ६ ऑक्टोबरला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

ED Summons To Ranbir Kapoor: रणबीर कपूरला ईडीने नोटीस पाठवल्यामुळे तो चर्चेत आला आहे.

Priya More

Bollywood Actor Ranbir Kapoor:

बॉलिवूडचा (Bollywood) सुपरस्टार रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या चर्चेत आला आहे. रणबीर चर्चेत येण्यामागचे कारण त्याचा चित्रपट नाही. तर रणबीर कपूरला ईडीने नोटीस पाठवल्यामुळे तो चर्चेत आला आहे. ऑनलाईन गेमिंग प्रकरणात (Online Gaming Case) ईडीने (ED) रणबीरला नोटीस पाठवली आहे. ईडीने अभिनेत्याला समन्स पाठवत ६ ऑक्टोबर म्हणजे शुक्रवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने बुधवारी बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरला समन्स बजावले. त्याला ६ ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे संपूर्ण प्रकरण 'महादेव बुक ऑनलाइन लॉटरी'शी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाशी संबंधित आहे. या ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपमुळे आधीच १७ बॉलिवूड स्टार ईडीच्या रडारवर आहेत. आता ईडीने याप्रकरणात रणबीर कपूरला देखील नोटीस पाठवत चौकशीसाठी बोलवले आहे.

काही आठवड्यांपूर्वी याच प्रकरणात टायगर श्रॉफ, सनी लिओन, नेहा कक्कर, भारती सिंह, एली अवराम, भाग्यश्री, कीर्ति खरबंदा, नुसरत भरूचा, विशाल ददलानी आणि राहत फतेह अली खान यासारख्या दिग्गज सेलिब्रिटींची नावे समोर आली होती. आता या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे जातोय तसतसं इतर सेलिब्रिटींची देखील नावं समोर येत आहेत. आता ईडीच्या रडारवर रणबीर कपूर आला आहे. ईडी ६ ऑक्टोबरला रणबीरची चौकशी करणार आहे.

'महादेव गेमिंग-बेटिंग' हा एक ऑनलाईन सट्टेबाजीचा प्लॅटफॉर्म आहे. या अ‍ॅपचा टर्नओव्हर जवळपास २०००० कोटी रुपये इतका आहे. या अ‍ॅपचे प्रमोटर सौरभ चंद्राकर याचे दुबईमध्ये फेब्रुवारी महिन्यात लग्न झाले होते. या लग्नाला २०० कोटींपेक्षा जास्त पैसे खर्च करण्यात आला होता. या शाही लग्नसोहळ्याचा व्हिडीओ समोर आला होता. या लग्नाला ज्या बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती ते सर्व ईडीच्या रडारवर आहेत. या लग्नाला उपस्थित राहिल्यामुळे हे सर्व स्टार्स अडचणीत आले आहेत.

बेकायदेशीर सट्टेबाजीच्या या प्रकरणात ईडीने आता मोठे पाऊल उचलले असून सेलिब्रिटींना समन्स पाठवण्यास सुरुवात केली आहे. ज्यामध्ये पहिले नाव रणबीर कपूरचे आहे. ईडीने रणबीरला चौकशीसाठी बोलावले आहे. या चौकशीवेळी त्याला लग्नाला उपस्थित राहणे, त्याठिकाणी परफॉर्म करणे, तसंच पैसे घेणे इत्यादींपासून इतर प्रश्न ईडी त्याला विचारू शकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Samantha Prabhu: 'मला आई व्हायचंय...' घटस्फोटाच्या ३ वर्षांनंतर अभिनेत्रीची मातृत्वाची इच्छा

Maharashtra Election : कोणत्या जिल्ह्यात किती उमेदवार, महिला उमेदवाराची संख्या सर्वाधिक कुठे?

Viral Video: अबब! जेवणाचा थाट पाहून डोळे विस्फारतील, दक्षिण भारतातील व्हिडीओ व्हायरल

Maharashtra News Live Updates : कोल्हापुरात आतापर्यंत २० कोटींचा मुद्देमाल जप्त, 24 हजार संशयितांवर कारवाई

Pune Politics: शरद पवारांचा मास्टर स्ट्रोक, मतदानापूर्वी पुण्यातील टिंगरे, तुपे आणि धनकवडेंच्या हाती 'तुतारी'

SCROLL FOR NEXT