Zaira Wasim On Suhani Bhatnagar Death Case Saam Tv
मनोरंजन बातम्या

'कदाचित ही अफवा असती तर...', 'दंगल गर्ल' Suhani Bhatnagar च्या निधनामुळे ऑनस्क्रीन बहिणीला बसला धक्का

Suhani Bhatnagar Death: सुहानी भटनागरच्या अचानक निधनामुळे दंगल चित्रपटाच्या संपूर्ण टीमलाच मोठा धक्का बसला आहे. अशामध्ये सुहानीची दंगल चित्रपटातील ऑनस्क्रीन बहीण अर्थात झायरा वसीमने (Zaira Wasim) दु:ख व्यक्त केले.

Priya More

Zaira Wasim On Suhani Bhatnagar Death Case:

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा (Aamir Khan) सुपरहिट चित्रपट दंगलमध्ये ज्युनिअर बबीता फोगटची भूमिका साकारणारी सुहानी भटनागरचा (Suhami Bhatnagar) दुर्दैवी मृत्यू झाला. सुहानीच्या मृत्यूमुळे संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीसह तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अजूनही कोणालाही विश्वास बसत नाहीये ही सुहानी या जगामध्ये नाहीये. १९ वर्षांच्या सुहानीला डरमेटोमायसाइटिस नावाचा आजार झाला होता.

सुहानी भटनागरच्या अचानक निधनामुळे दंगल चित्रपटाच्या संपूर्ण टीमलाच मोठा धक्का बसला आहे. अशामध्ये सुहानीची दंगल चित्रपटातील ऑनस्क्रीन बहीण अर्थात झायरा वसीमने (Zaira Wasim) दु:ख व्यक्त केले. झायराने या चित्रपटामध्ये बबीताची मोठी बहीण अर्थात गीता फोगाटची भूमिका साकारली होती. आपल्या सहकलाकाराचा मृत्यू झाल्यामुळे झायराला मोठा धक्का बसला आहे.

Zaira Wasim Insta Post

झायरा वसीमने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून सुहानीच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे. झायराने लिहिले की, 'सुहानी भटनागरच्या निधनाने मला इतका मोठा धक्का बसला आहे की मी ते शब्दात व्यक्त करू शकत नाही. या कठीण काळात मी तिच्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त करते. तिचे आई-वडील कोणत्या परिस्थितीतून जात असतील या विचाराने माझे मला खूप दुख: होत आहे. मी नि:शब्द आहे.'

झायरा वसीम सुहानीच्या निधनाच्या धक्क्यातून सावरू शकलेली नाही. ही बातमी फक्त एक अफवा असावी असे तिला वाटत आहे. टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना झायरा म्हणाली की, 'मी नुकतेच याबद्दल वाचले आणि माझा यावर विश्वास बसत नाही. मला असे वाटते की ती फक्त एक अफवा असावी. माझी इच्छा आहे की ते वृत्त खोटे असावे. हे ऐकल्यापासून माझ्या मनात तिच्यासोबतच्या क्षणांचे फ्लॅशबॅक झाले. ती खूप छान व्यक्ती होती आणि आमच्या खूप गोड आठवणी होत्या. तिच्या आई-वडिलांना काय त्रास होत असेल याची मी कल्पनाही करू शकत नाही. त्यांना या दु:खातून सावरण्यासाठी शक्ती मिळो अशी मी प्रार्थना करतो.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवतांडव नृत्य ठरले विशेष आकर्षण|VIDEO

IPS अंजना कृष्णा प्रकरणात मिटकरींचा यू-टर्न; आधी चौकशीची मागणी,आता दिलगिरी

Anant Chaturdashi 2025 live updates : कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणूक रेंगाळली

Dhokla Recipe : ढोकळा जाड होतो? बॅटर नीट होतंच नाही? वाचा मऊसुत ढोकळ्याची रेसिपी

Face Care: विड्याच्या पानांनी तयार केलेला फॅसपॅक लावा चेहऱ्यावर, १५ मिनिटांत स्किन करेल ग्लो

SCROLL FOR NEXT