kareena kapoor ignored ex boyfriend shahid kapoor  Saam TV
मनोरंजन बातम्या

Kareena Kapoor: दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यात करीना कपूरने शाहिद कपूरला केलं इग्नोर, VIDEO होतोय व्हायरल

Kareena Kapoor Video: या पुरस्कार सोहळ्यातील करीना कपूरचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये करीना कपूर पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात एन्ट्री करताना दिसत आहे. यावेळी करीना कपूरने असं काही केलं ज्यामुळे ती चर्चेत आळी आहे.

Priya More

Dada Saheb Phalke Award 2024:

दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2024 हा पुरस्कार (Dada Saheb Phalke Award 2024) सोहळा नुकताच पार पडला. 20 फेब्रुवारीला मुंबईमध्ये या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या पुरस्कार सोहळ्याचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या पुरस्कार सोहळ्याला बॉलिवूडपासून ते टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी आपल्या हटके ड्रेसिंग स्टाइलमध्ये हजेरी लावली.

या पुरस्कार सोहळ्याला करीना कपूरपासून (Kareena Kapoor) ते शाहरुख खानपर्यंत (Shah Rukh Khan) अनेक स्टार्संनी हजेरी लावली. या पुरस्कार सोहळ्यातील करीना कपूरचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये करीना कपूर पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात एन्ट्री करताना दिसत आहे. यावेळी करीना कपूरने असं काही केलं ज्यामुळे ती चर्चेत आळी आहे.

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर तिच्या चित्रपटांसोबतच वैयक्तिक आयुष्यासाठीही चर्चेत असते. सैफ अली खानसोबत लग्न करण्यापूर्वी करीना कपूर आणि शाहिद कपूर (Shahid Kapoor) यांच्या अफेअरच्या अनेक बातम्या समोर आल्या होत्या. त्ययांच्या अफेअरच्या चांगल्याच चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर दोघेही एकमेकांशी अजिबात बोलत नाहीत. अशामध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यातील करीना कपूर आणि शाहिद कपूर यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये करीना कपूर डॅशिंग ड्रेसिंग स्टाईलमध्ये इव्हेंटमध्ये एन्ट्री करताना दिसत आहे. तर शाहिद कपूर याठिकाणी काही जणांसोबत गप्पा मारताना दिसत आहे. त्याचवेळी करीना कपूर पुरस्कार सोहळ्यामध्ये एन्ट्री करताना शाहिद कपूरकडे दुर्लक्ष करून पुढे जाताना दिसते. यानंतर शाहिद कपूरने मला एक गोड स्माईल दिली आणि तोही तिथून निघून गेला. करिना कपूर आणि शाहिद कपूरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

करीना कपूर आणि शाहिद कपूरच्या या व्हायरल व्हिडिओवर यूजर्सने जोरदार कमेंट केल्या आहेत. कोणी करीना कपूरला अहंकारी म्हटले तर काही जण करीना कपूरचे कौतुक करताना दिसले. कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, 'आज पुन्हा त्या रस्त्यावरून जावे लागले ज्यावरून आधी गेलो होतो...' तर अनेक यूजर्स शाहिद कपूरची खिल्ली उडवताना दिसले. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

UPI Cash Deposit: कॅश डिपॉजिट कराचीय, पण बँकेच्या गर्दीचं टेन्शन आलंय? UPI मिटवेल चिंता, जाणून घ्या पैसे जमा करण्याची प्रक्रिया

Mughal harem : मुघल हरममध्ये रात्रीच्या वेळी कोणते नियम पाळावे लागत असत?

Nanded : नियमबाह्य कारभार भोवला; नांदेड जिल्ह्यात २८ कृषी सेवा केंद्रांवर कारवाई

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना दणका; 'या' महिलांना १५०० रुपये मिळणार नाही पाहा, VIDEO

Ahilyanagar News : दारू पितो, महिला नाचवतो, दहशत करतो; तृप्ती देसाईंचे भाजप नेत्यांवर गंभीर आरोप, थेट पुरावाच दिला

SCROLL FOR NEXT