Parineeti Chopra Workout Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Parineeti Chopra ने जंकफूड खाऊन वजन का वाढलं?, आता कमी करण्यासाठी जिममध्ये करतेय मेहनत, VIDEO व्हायरल

Parineeti Chopra Workout Video: परिणीती 'चमकिला' (Chamkila Movie) चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटासाठी परिणीती चोप्रा खूपच मेहनत घेतना दिसत आहे. या चित्रपटासाठी तिने तब्बल १५ किलो वजन वाढवले होते.

Priya More

Chamkila Movie:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) सध्या तिच्या आगामी चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. परिणीती 'चमकिला' (Chamkila Movie) चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटासाठी परिणीती चोप्रा खूपच मेहनत घेतना दिसत आहे. या चित्रपटासाठी तिने तब्बल १५ किलो वजन वाढवले होते.

आता हे वजन कमी करण्यासाठी परिणीती जिममध्ये घाम गाळत आहे. वजन कमी करणे खूपच कठीण असल्याचे परिणीतीने सांगितले. परिणीतीने नुकताच सोशल मीडियावर जिममध्ये वर्कआऊट करताना व्हिडीओ शेअर केला आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

परिणिती चोप्राने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर जिममध्ये वर्कआऊट करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत परिणीतीने कॅप्शनमध्ये असे लिहिले की, 'मी गेल्या वर्षी 6 महिने रहमान सरांच्या स्टुडिओमध्ये गाणं गाण्यामध्ये घालवले. त्यानंतर घरी येऊन 'चमकिला'साठी १५ किलो वजन वाढवण्यासाठी जास्तीत जास्त जंक फूड खाल्लं.!'

परिणितीने या पोस्टमध्ये असे देखील लिहिले आहे की, 'संगीत आणि अन्न.' हा माझा दिनक्रम होता. आता हा चित्रपट तयार झाल्यानंतर कथा उलटी झाली आहे. मला स्टुडिओची आठवण येते आणि मी पुन्हा पूर्वीसारखे दिसण्याचा प्रयत्न करण्यासाठी जिममध्ये व्यायाम करते. अमरज्योतजी सारखे नाही! हे कठीण आहे. परंतु इम्तियाजसर तुमच्यासाठी काहीही आणि या भूमिकेसाठी. अजून काही इंच वजन कमी करणं बाकी आहे.'

परिणीती चोप्राची आई रीमा चोप्राने आपली मुलगी परिणीतीला प्रोत्साहन देण्यासाठी तिच्या पोस्टवर कमेंट केली आहे. त्यांनी लिहिले की, 'तुझ्या समर्पणाचा आणि चिकाटीचा अभिमान आहे. जीवनाचा आणि करिअरचा प्रत्येक टप्पा महत्त्वाचा आहे आणि तुम्ही जसा व्यवहार करता तसाच सामना करावा. संयम, दृढनिश्चय आणि संतुलन. तुझा अभिमान वाटतो.'

दरम्यान, परिणीती चोप्राचा 'चमकिला' हा एक चित्रपट प्रसिद्ध पंजाबी लोकगायक अमर सिंग चमकिला यांच्या जीवनावर आधारित आहे. इम्तियाज अली दिग्दर्शित या चित्रपटात परिणीती चोप्रासोबत अभिनेता दिलजीत दोसांझने मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचे संगीत ए आर रहमान यांनी दिले आहे. सध्या या चित्रपटासाठी परिणीतीने घेतलेल्या मेहनतीचे खूप कौतुक केले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

Monsoon Alert : पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर धो धो कोसळणार, पुढील ५ दिवस आषाढधारा, वाचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT