Arjun Kapoor Wish Malaika Arora Saam Tv
मनोरंजन बातम्या

Arjun Kapoor Wish Malaika Arora: अर्जुनने मलायकाला रोमँटिक अंदाजमध्ये दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, अभिनेत्रीनं दिला जबरदस्त रिप्लाय

Happy Birthday Malaika Arora: मलायकाचा बॉयफ्रेंड अर्थात अभिनेता अर्जुन कपूरनेही आपल्या लेडी लव्हला वाढदिवसाच्या रोमँटिंक अंदाजमध्ये खास शुभेच्छा दिल्या आहेत.

Priya More

Malaika Arora Birthday:

बॉलिवूडची 'मुन्नी' अर्थात अभिनेत्री मलायका अरोरा आज आपला ५० वा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसानिमित्त मलायकावर तिच्या चाहत्यांसह बॉलिवूड सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.

करीना कपूर, करिश्मा कपूर, अमृता अरोरा आणि शिल्पा शेट्टीसह अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट करत मलायकाला शुभेच्छा दिल्या. आता मलायकाचा बॉयफ्रेंड अर्थात अभिनेता अर्जुन कपूरनेही आपल्या लेडी लव्हला वाढदिवसाच्या रोमँटिंक अंदाजमध्ये खास शुभेच्छा दिल्या आहेत. अर्जुनने मलायकासोबतचा रोमँटिक फोटो शेअर करत त्याला जबरदस्त कॅप्शन दिले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

२३ ऑक्टोबर हा मलायका आणि अर्जुन कपूरसाठी खूप खास दिवस आहे. मलायकाच्या वाढदिवसानिमित्त अर्जुननेही जोरदार सेलिब्रेशन केले आहे. अर्जुनने मलायकासोबतचा रोमँटिक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत त्याला जबरदस्त कॅप्शन दिले आहे. त्याने असे लिहिले आहे की, 'हॅपी बर्थडे बेबी!!! हा फोटो आपला आहे, तू नेहमी हसत आणि आनंदी राहा. मी सदैव तुला साथ देईन.'

अर्जुन कपूरने मलायकासाठी केलेली ही खास पोस्ट चर्चेत आहे. अर्जुनच्या या पोस्टवर मलायकाने देखील प्रेमाचा वर्षाव केला आहे. तिने कमेंटमध्ये 'लव्ह यू' असे लिहिले आहे. या पोस्टवर इतरही अनेक सेलिब्रिटींनी मलाइकाला शुभेच्छा दिल्या. संजय दत्तची पत्नी मान्यताने मलायकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अर्जुन आणि मलायका हे सध्या बॉलिवूडमधील सर्वांचे आवडते कपल आहे. दोघेही नेहमीच चर्चेत असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघेही एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करत असतात. मलायका आणि अर्जुन गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये आहेत.

2016 मध्ये मलायका अरोरा आणि अरबाज खान यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आणि दोघांनी घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर मलायका आणि अर्जुन 2018 च्या फॅशन वीकमध्ये एकत्र दिसले होते. त्याच्या रिलेशनशीपच्या चर्चा नेहमीच होत असतात. अशामध्ये दोघंही लवकर लग्न करणार असल्याच्या बातम्या वारंवार समोर येतात. पण अद्याप त्यांनी लग्नाबाबत घोषणा केली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: शून्य मेहनत! आता मटार सोलायला अर्धा तास लागणार नाही, सोशल मिडीयावर व्हायरल झाला हॅक

Municipal Elections Voting Live updates : भाजप उमेदवाराने 600 ते 650 बोगस मतदार आणल्याचा अपक्ष उमेदवाराच्या प्रतिनिधीचा आरोप

Homemade Lip Oil : लिप बाम विसरा ओठांना सॉफ्ट ठेवण्यासाठी घरच्या घरी बनवा लिप ऑईल

Pomegranate Skin Benefits : डाळिंबाच्या रसाने चेहरा सोन्यासारखा चमकेल, फक्त फॉलो करा 'या' ३ स्टेप्स

कार्यकर्ते पैसे घेऊन आले, कुटुंबाने तोंडावर नोटा उधळत हाकलून लावले VIDEO

SCROLL FOR NEXT