Shah Rukh-Salman-Aamir Dance Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Anant-Radhika Pre wedding: अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये 'खान्स'चा जलवा, सलमान-शाहरुख-आमिरचा 'नाटू-नाटू'वरील डान्स VIDEO Viral

Shah Rukh-Salman-Aamir Dance Video: या फंक्शनमध्ये बॉलिवूडच्या खान्सचा जलवा पाहायला मिळला. सुपरस्टार सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान यांनी या फंक्शनमध्ये स्टेजवर एकत्र येत 'RRR'चित्रपटातील सुपरहिट गाणं 'नाटू-नाटू' वर अफलातून डान्स केला.

Priya More

Anant Ambani-Radhika Merchant Pre-Wedding:

देशातील प्रसिद्ध आणि मोठे उद्योगपती मुकेश अंबानी(Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Neeta Ambani) यांच्या घरी सध्या लगीनघाई सुरू आहे. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा छोटा मुलगा अर्थात उद्योगपती अनंत अंबानी (Anant Ambani) लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांचे प्री-वेडिंग फंक्शन (Anant Ambani-Radhika Merchant Pre-Wedding) गुजरातच्या जामनगरमध्ये सुरू आहे. या फंक्शनच्या पहिल्या दिवशी हॉलिवूड सिंगर रिहानाने चार चाँद लावले. तर दुसऱ्या दिवशी बॉलिवूड सेलिब्रिटींनी या फंक्शनमध्ये संपूर्ण लाइमलाइट खाल्लं.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग फंक्शनच्या दुसऱ्या दिवसाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फंक्शनमध्ये बॉलिवूडच्या खान्सचा जलवा पाहायला मिळला. सुपरस्टार सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान यांनी या फंक्शनमध्ये स्टेजवर एकत्र येत 'RRR'चित्रपटातील सुपरहिट गाणं 'नाटू-नाटू' वर अफलातून डान्स केला. या डान्स परफॉर्मन्सवेळी तिघांनी देखील आपल्या प्रसिद्ध चित्रपटांमधील सिग्नेचर स्टेप्स देखील केल्या. तिघांना एकत्र डान्स करताना पाहून त्यांचे चाहते आश्चर्यचकीत झाले. बॉलिवूडच्या या तीन सुपरस्टारला एकत्र डान्स करताना पाहण्याची संधी त्यांच्या चाहत्यांना मिळाली. यांच्या डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्यासाठी जामनगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये देशातील आणि जगातील नामवंत व्यक्तींनी हजेरी लावली. या फंक्शनमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींनी आपला जलवा दाखवला. डिझायनर आणि स्टायलिश ड्रेसिंग करत या सेलिब्रिटींनी सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं. या सेलिब्रिटींचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ३ दिवस चालणाऱ्या या उत्सवाचा आज शेवटचा दिवस आहे.

दुसऱ्या दिवशी म्हणजेच 2 मार्चच्या रात्री एका कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये शाहरुख खान, आमिर खान आणि सलमान खान यांनी अनेक तरुण बॉलिवूड स्टार्ससोबत स्टेज शेअर केला होता. बी-टाऊनचे तीन खान शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान अनेक वर्षांनंतर एकत्र आले आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. तिघेही स्टेजवर गेले आणि त्यांनी आपल्या किलर आणि मजेदार परफॉर्मन्सने धुमाकूळ घातला.

एका व्हिडिओमध्ये ते 'RRR' चित्रपटातील 'नाटू-नाटू' गाण्यावर डान्स करताना दिसले. सलमानच्या पेटंट टॉवेल डान्सपासून ते आमिरच्या 'अपनी टू पाठशाला' हुक स्टेप'पर्यंत त्यांनी हजारो पाहुण्यांसाठी जबरदस्त डान्स केला. व्हायरल व्हिडिओमध्ये शाहरुख किलर स्टाईलमध्ये दिसत आहे. त्याने त्याच्या ब्लॉकबस्टर हिट फिल्म 'पठान' मधील 'झूम जो पठाण' गाण्यावर जबरदस्त डान्स केला. इतकेच नाही तर सलमान आणि आमिरने शाहरुखची सिग्नेचर पोझही रिक्रिएट केली. शाहरुख आणि गौरी खानपासून ते रणबीर कपूर आणि आलिया भट्टपर्यंत बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी या फंक्शनला हजेरी लावली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT