Shah Rukh Khan On Ram Charan Saam Tv
मनोरंजन बातम्या

इडली-वडा राम चरण कुठे आहेस तू..., Shah Rukh Khanच्या वक्तव्यावरून अभिनेत्याची मेकअप आर्टिस्ट संतापली; VIDEO व्हायरल

Shah Rukh Khan On Ram Charan: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांचे प्री-वेडिंग फंक्शन (Anant Ambani-Radhika Merchant Pre-Wedding) गुजरातच्या जामनगरमध्ये पार पडले. या कार्यक्रमाला साऊथ फिल्म इंडस्ट्रीपासून ते बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते.

Priya More

Anant Ambani-Radhika Merchant Pre-Wedding:

देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी(Mukesh Ambani) यांचा छोटा मुलगा अर्थात उद्योगपती अनंत अंबानी (Anant Ambani) लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांचे प्री-वेडिंग फंक्शन (Anant Ambani-Radhika Merchant Pre-Wedding) गुजरातच्या जामनगरमध्ये पार पडले. या कार्यक्रमाला साऊथ फिल्म इंडस्ट्रीपासून ते बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. या कार्यक्रमामध्ये या सेलिब्रिटींनी जबरदस्त परफॉर्मन्स करत धम्माल केली. या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी हॉलिवूड सिंगर रिहानाने जबरदस्त परफॉर्मन्स देत या कार्यक्रमात चार चाँद लावले.

अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग फंक्शनच्या दुसऱ्या दिवशी बॉलिवूडच्या ३ खान्सने म्हणजे शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खानने जबरदस्त डान्स परफॉर्मन्स दिला. सुपरस्टार सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान यांनी या फंक्शनमध्ये स्टेजवर एकत्र येत 'RRR'चित्रपटातील सुपरहिट गाणं 'नाटू-नाटू' वर अफलातून डान्स केला. या डान्स परफॉर्मन्सवेळी तिघांनी देखील आपल्या प्रसिद्ध चित्रपटांमधील सिग्नेचर स्टेप्स देखील केल्या. तिघांना एकत्र डान्स करताना पाहून त्यांचे चाहते आश्चर्यचकीत झाले. त्यांच्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

'नाटू-नाटू' गाण्यावर डान्स करत असताना सलमान, शाहरुख आणि आमिर यांना साऊथ अभिनेता राम चरणने देखील जॉईन केले. शाहरुख खानने स्वत:च राम चरणला स्टेजवर येण्यासाठी सांगितले. या चौघांनी देखील या कार्यक्रमात एकत्र जबरदस्त डान्स केला. पण यावेळी शाहरुख खानने केलेल्या एका मस्करीमुळे तो वादामध्ये सापडला आहे. यावेळी किंग खानने राम चरणला 'इडली-वडा राम चरण तू कुठे आहे?', असे म्हटले.

शाहरुख खानच्या या वक्तव्यामुळे राम चरणचे फक्त चाहतेच नाराज झाले नाही तर त्याच्या मेकअप आर्टिस्ट झेबा हसीनही नाराज झाली आहे. शाहरुखच्या बोलण्याने ती इतकी चिडली की तिने अंबानींची पार्टी सोडली. तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर व्हिडिओ पोस्ट करून लिहिले, 'भेंड इडली वडा राम चरण तू कुठे आहेस? यानंतर मी तिथून निघून गेले. राम चरणसारख्या स्टारचा असा अपमान.' पिंकविलाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर याचा एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यावर झेबा हसीनने कमेंट केली होती. तिने लिहिले की, 'मी शाहरुख खानची खूप मोठी फॅन आहे. पण त्याने ज्यापद्धतीने राम चरणला स्टेजवर बोलावले ते मला आवडले नाही.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT